जाहिरात

Zohran Mamdani: ट्रम्प यांच्या धमकीनंतरही न्यूयॉर्कचे 'बॉस' म्हणून निवडून आलेले जोहरान ममदानी कोण आहेत?

Who is Zohran Mamdani: न्यूयॉर्क शहरात नुकत्याच झालेल्या महापौर निवडणुकीत डेमोक्रेटिक (Democratic) पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी (Zohran Mamdani) यांनी एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

Zohran Mamdani: ट्रम्प यांच्या धमकीनंतरही न्यूयॉर्कचे 'बॉस' म्हणून निवडून आलेले जोहरान ममदानी कोण आहेत?
Zohran Mamdani : ममदानी यांच्या पराभावासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप जोर लावला होता.
मुंबई:

Who is Zohran Mamdani: अमेरिकेचंच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचं केंद्र असलेल्या न्यूयॉर्क शहरात नुकत्याच झालेल्या महापौर निवडणुकीत डेमोक्रेटिक (Democratic) पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी (Zohran Mamdani) यांनी एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, ममदानी यांना या निवडणुकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी प्रखर विरोध केला होता. ट्रम्प यांच्या तीव्र विरोधानंतरही ममदानी विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांची सध्या जगभर चर्चा होत आहे. 

सर्वात तरुण, पहिले मुस्लीम

फक्त 34 वर्षांचे असलेले ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे महापौरपद जिंकणारे सर्वात तरुण (Youngest) नेते ठरले आहेत. त्यांचे हे यश अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे, कारण ते न्यूयॉर्कचे पहिले दक्षिण आशियाई (South Asian) आणि पहिले मुस्लीम (Muslim) महापौर बनले आहेत.

भारताशी खास नातं

जोहरान ममदानी यांचे भारताशी असलेले नाते खूप खास आहे. त्यांची आई मीरा नायर (Mira Nair) या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध अशा चित्रपट निर्मात्या आहेत.

Latest and Breaking News on NDTV

त्यांचे वडील महमूद ममदानी (Mahmood Mamdani) हे युगांडातील प्रसिद्ध लेखक आणि भारतीय वंशाचे मार्क्सवादी (Marxist) विद्वान आहेत. ममदानी यांचा जन्म आफ्रिकेतील युगांडा येथे झाला असला तरी, ते न्यूयॉर्क शहरात वाढले. त्यांचे मूळ संबंध अनेक देशांशी जोडलेले आहेत.

(नक्की वाचा : GPS उभे आहात की झोपलेले, कसं आहे तुमचं घर? प्रत्येक क्षण होतोय रेकॉर्ड; डिजिटल पाळत थांबवण्यासाठी करा हे उपाय )
 

ट्रम्प यांचा कडाडून विरोध आणि धमकी

न्यूयॉर्क महापौरपदाची ही निवडणूक अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांच्या विरोधात जोर लावला होता. ट्रम्प यांनी 'ट्रूथ' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ममदानी निवडून आले तर न्यूयॉर्क शहराला 'आर्थिक आणि सामाजिक आपत्ती क्षेत्र (Total Economic and Social Disaster)' म्हणून जाहीर केले जाईल, अशी मतदारांना (Voters) थेट धमकी (Warning) दिली होती.

ट्रम्प यांनी ममदानी यांना 'डावे (Leftist)' उमेदवार संबोधून माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो (Andrew Cuomo) यांना पाठिंबा दिला होता. मात्र, या प्रचंड राजकीय विरोधाला न जुमानता, न्यूयॉर्कच्या मतदारांनी ममदानी यांच्या बाजूनं कौल दिला, ज्यामुळे ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.

Latest and Breaking News on NDTV

युगांडात जन्म, न्यूयॉर्कमध्ये शिक्षण आणि राजकीय प्रवास

वेगवेगळ्या संस्कृतींचा वारसा असलेले ममदानी यांचे बालपण अनेक देशांमध्ये गेले. युगांडामध्ये जन्मल्यानंतर ते न्यूयॉर्क शहरात आले आणि येथेच वाढले.  त्यांनी न्यूयॉर्क शहराच्या पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ब्रोंक्स हायस्कूल ऑफ सायन्स येथून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर मेन येथील बॉडॉइन कॉलेजमधून (Bowdoin College) त्यांनी आफ्रिकाना स्टडीजमध्ये (Africana Studies) पदवी मिळवली. त्यांना 2018 मध्ये अमेरिकन नागरिकत्व मिळालं. 

राजकारणात येण्यापूर्वी, ममदानी यांनी हाऊसिंग काऊन्सिलर (Housing Counselor) म्हणून काम केले, जिथे त्यांनी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना घरे आणि बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी मदत केली. या अनुभवातूनच त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. ते न्यूयॉर्क राज्य असेंब्लीचे सदस्य आणि डेमोक्रेटिक सोशलिस्ट (Democratic Socialist) आहेत.

ममदानी यांची प्रचार मोहीम तरुणांमध्ये खूप गाजली. टिकटॉक, इंस्टाग्राम आणि हिप-हॉप म्युझिक असलेल्या प्रचारात्मक व्हिडिओंमुळे ते न्यूयॉर्कच्या तरुणांमध्ये झपाट्याने लोकप्रिय झाले, ज्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com