Elon Musk On Netflix Viral News : एलन मस्क नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. सध्याच्या घडीला कोणीतरी त्यांच्या निशाण्यावर येतच असतो. आता मस्क यांनी ओटीटीचं सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर निशाणा साधला आहे. अमेरिकेचे उर्जा विभागाचे माजी शास्त्रज्ञ आणि अॅप्पलच्या माजी फोटोग्राफर मॅट व्हॅन स्वोल (Matt Van Swol) यांनी एक्सवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन रद्द केल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या या पोस्टवर मस्क यांनी रिट्वीट करत त्यांच्या निर्णयाला दुजोरा दिला आहे. नेटफ्लिक्सने अशा एका व्यक्तीला नोकरीवर ठेवलं आहे, ज्याने चार्ली कर्क यांच्या हत्येचं सेलिब्रेशन केलं होतं.तसच तो व्यक्ती मुलांसाठी प्रो-ट्रान्स कंटेटही बनवतो, असा दावा त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून केला आहे. यामुळेच त्यांनी नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन रद्द केलं आहे, अशी चर्चा आहे.
मॅट व्हॅन स्वोल यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, त्यांनी नेटफ्लिक्स अकाऊंटचं सदस्यत्व रद्द केलं आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की,हा निर्णय नेटफ्लिक्समध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यामुळे घेण्यात आला आहे. त्या कर्मचाऱ्यावर आरोप करण्यात आला आहे की, कर्मचारी मुलांसाठी प्रो-ट्रान्स कंटेटही बनवतात. जर असे लोक नेटफ्लिक्समध्ये काम करत असतील,तर तुम्हाला माझ्याकडून एक पैसाही मिळणार नाही, असं त्यांनी नेटफ्लिक्स कंपनीला सुनावलं आहे.
नक्की वाचा >> सोनं चोरट्यांच्या सुळसुळाट! महिलेनं साडीत लपवला सोन्याच्या हार, दुकानदाराला पत्ताही लागला नाही..Video
एलन मस्क यांच्या ट्वीटर पोस्टची होतेय तुफान चर्चा
शास्त्रज्ञांच्या या ट्वीटला रिपोस्ट करत एलन मस्क यांनी म्हटलं की सेम (Same)..म्हणजेच मस्क यांनी त्यांच्या निर्णयाला सहमती दर्शवली. त्यामुळे मस्कही आता नेटफ्लिक्सचं सदस्यत्व रद्द करू शकतात. रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सच्या ज्या कर्मचाऱ्याबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे. हामिश स्टेले (Hamish Steele) असं त्या कर्मचाऱ्याचं नाव आहे.त्यांनी चार्ली किर्क यांच्या हत्येबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.स्टील डेडएंडिया आणि नेटफ्लिक्सचं डेड एंड पॅरानॉर्मल पार्क शो चे निर्माता आहे. पॅरानॉर्मल पार्कची एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती.
त्यांनी गेल्या महिन्यात ब्लूस्कायवर चार्ली किर्क यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी एका पोस्टच्याा माध्यमातून किर्क यांची खिल्ली उडवली होती. त्यांनी पोस्टमध्ये किर्क यांना 'नाजी' असं म्हटलं होतं.दरम्यान, चार्ली किर्क यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. हजारो लोक त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.यामुळेच स्टील आणि मस्क नेटफ्लिक्स विरोधात भूमिका मांडून सदस्यत्व रद्द करत आहेत.
नक्की वाचा >> गरबा खेळली अन् मध्यरात्री घरी निघाली, रस्त्यात एकटीला पाहून Rapido ड्रायव्हरने जे केलं..तरुणीनं थेट VIDEO बनवला अन् नंतर..