Vivek Ramaswamy : ट्रम्प सत्तेत येताच भारतीय वंशाच्या खासदाराने दिला मोठा धक्का, विवेक रामास्वामी 'DOGE' मधून बाहेर पडले

भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे बायोटेक व्यवसायातील मोठं नाव आहे. रामास्वामी हे बायोटेक कंपनी रोइव्हंट सायन्सेसचे (Roivant Sciences) मालक आहेत. 2016 मध्ये त्यांनी Roivant Sciences या सर्वात मोठ्या जैवतंत्रज्ञान कंपनीची स्थापना केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Born to Indian parents in Cincinnati, Ramaswamy studied at Harvard University and then Yale Law School

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी सरकारी कार्यक्षमता विभागाचा (DOGE) राजीनामा दिला आहे. व्हाईट हाऊसने सोमवारी स्पष्ट केले की, विवेक रामास्वामी यापुढे सरकारी कार्यक्षमता विभागाचा (DOGE) भाग असणार नाहीत. मंत्रिमंडळाच्या निवडीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांची इलॉन मस्क यांच्यासोबत डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी (DOGE) चे प्रमुख म्हणून निवड केली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विवेक रामास्वामी यांना ओहायोच्या गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवायची आहे. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर काही वेळातच व्हाईट हाऊसने ही माहिती दिली. गव्हर्नर पदावर निवड झाल्यास ते ओहायोचे पहिले भारतीय अमेरिकन गव्हर्नर असतील. मात्र, गव्हर्नर पदासाठी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

रामास्वामी यांनी ट्वीट करत म्हटलं की, DOGE तयार करण्यात मदत करणे हा सन्मान होता. ओहायोमधील माझ्या भविष्यातील योजनांबद्दल मी सांगेलच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेला पुन्हा महान राष्ट्र बनवण्यासाठी आम्ही अध्यक्ष ट्रम्प यांना मदत करण्यास सदैव तयार आहोत.

(नक्की वाचा- Who is Kash Patel : कोण आहेत काश पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यांच्यावर सोपवली FBI ची जबाबदारी)

Advertisement

विवेक रामास्वामी यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांनी उमेदवारीही सादर केली होती. मात्र, त्यांनी आता ओहायोच्या गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच विवेक रामास्वामी यांना सरकारी कार्यक्षमतेच्या विभागाचा (DOGE) राजीनामा दिला. 

कोण आहेत विवेक रामास्वामी?

भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे बायोटेक व्यवसायातील मोठं नाव आहे. रामास्वामी हे बायोटेक कंपनी रोइव्हंट सायन्सेसचे (Roivant Sciences) मालक आहेत. 2016 मध्ये त्यांनी Roivant Sciences या सर्वात मोठ्या जैवतंत्रज्ञान कंपनीची स्थापना केली. बायोफार्मा सेक्टरमधील इतर अनेक कंपन्यांचे देखील ते संस्थापक आहेत. ज्यात मायोव्हंट सायन्सेस, युरोव्हंट सायन्सेस, एंजिवेंट थेरप्युटिक्स, अल्टाव्हंट सायन्सेस आणि स्पिरोव्हंट सायन्सेस यांचा समावेश आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  BRICS ला धमकी, WHO तून बाहेर; पारलिंगी बेदखल, सत्ता हाती घेताच Donald Trump यांनी घेतले 10 महत्त्वाचे निर्णय)

2015 मध्ये फोर्ब्स मासिकाच्या कव्हर पेजवर देखील ते झळकले होते. फोर्ब्स मासिकानुसार 2014 मध्ये 30 वर्षाखालील सर्वात श्रीमंत उद्योजकांमध्ये विवेक 30 व्या क्रमांकावर होते. 2016 मध्ये, ते 40 वर्षाखालील श्रीमंत उद्योजकांमध्ये 24 व्या क्रमांकावर होते.

Advertisement

Topics mentioned in this article