World Migratory Bird Day : आकाशात एकाच वेळी कोटींमध्ये पक्षी दिसले तर काय होईल? तुम्ही आकाशात एकटक पाहात राहाल, नाही का? जगातील एका भागात असंच काहीसं चित्र दिसतं. येथे एकाच रात्रीत ३७.३ कोटी स्थलांतरित पक्षी एकत्रित आकाशातून झेप घेतात. पक्ष्यांची ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या तब्बल ३५ कोटींहून अधिक आहे. भारतातही मोठ्या संख्येतून संपूर्ण देशभरातली स्थलांतरित पक्षी दाखल होत असतात.
पक्ष्यांना त्रास देऊ नका, पक्षी तज्ज्ञांचं आवाहन
अमेरिकेचे कॉर्नेल लॅबच्या बर्डकास्टनुसार, ४ मेच्या सायंकाळी तब्बल ३७.३ कोटी प्रवासी पक्षी उत्तरेकडे आपल्या प्रवास सुरू ठेवतील. यामध्ये अधिकांश पक्षी अमेरिकेच्या दक्षिण आणि पूर्वेकडील तटावर दिसतील. वन्यजीव तज्ज्ञ या पक्ष्यांना पाहू इच्छिणाऱ्या सर्वांना नम्रपणे विनंती करत आहेत की, त्यांनी या पक्षांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये.
स्थलांतरित पक्षी उन्हाळ्यात करतात उत्तरेकडे प्रवास
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षी दोन मुख्य कारणांमुळे प्रवास करतात. जेवण आणि घरट्याच्या शोधात जगभरात प्रवास करतात. सर्वसाधारणपणे, उन्हाळ्याच्या महिन्यांत पक्षी उत्तरेकडे प्रवास करतात. या काळात कीटक आणि नवीन वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. थंड हवामानात, थंडीपासून वाचण्यासाठी ते दक्षिणेकडे परत येतात. मात्र अनेक पक्षी बर्फाळ परिस्थितीतही तग धरतात.
रात्रीच्या वेळी किती पक्षी उडतात, गणना कशी होते?
बर्डकास्ट संस्थेचे अभ्यासक पक्ष्यांची गणना कशी करतात, रात्रीच्या वेळी आकाशात किती पक्षी असतात? मोजणीचं मॉडेल प्रामुख्याने राष्ट्रीय पर्यावरण पूर्वानुमान केंद्राचा डेटा आणि हवामान निरीक्षण रडारच्या वापराने केली जाते. हे २३ वर्षांच्या रडार वातावरणीय निरीक्षण माहितीवर आधारित आहे. वेगवेगळ्या हवामान परिस्थिती आणि स्थलांतराच्या निरीक्षणांमधील संभाव्य संबंधांचा अभ्यास केल्याने संशोधकांना कोणत्याही विशिष्ट दिवसासाठी अंदाज वर्तवण्यासाठी संगणकीय मॉडेल तयार करता येतात.
भारतात जगभरातून येतात स्थलांतरित पक्षी...
भारतात दरवर्षी ३७० हून अधिक प्रजातीचे स्थलांतरित पक्षी येतात. अधिकांश पक्षी थंडीच्या दिवसात येतात. हे पक्षी चिल्का तलाव (ओडिशा), भरतपूर (केवलादेव नॅशनल पार्क, राजस्थान), रन ऑफ कच्छ (गुजरात) आणि पोंग डॅम (हिमाचल प्रदेश) सारख्या जागांवर दिसतात. भारतात येणाऱ्या स्थलांतरित पक्षांमध्ये सायबेरियन क्रेन, फ्लेमिंगो, पेलिकन, बार-हेडेड गूस आणि ब्लू थ्रोट्स प्रमुख आहेत. भारत हा मोठ्या प्रमाणावर मध्य आशियाई स्थलांतर मार्गाचा भाग आहे. हे स्थलांतरित पक्षी थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि अन्नाच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करीत येतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world