जाहिरात
This Article is From May 07, 2024

EVM ची पूजा करणे महागात पडलं, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल

रूपाली चाकणकर यांनी सकाळी मशीनची पूजा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

EVM ची पूजा करणे महागात पडलं, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल

प्रतीक्षा पारखी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मतदान सुरु होण्याआधीच चाकणकर यांनी ईव्हीएमची पूजा केली होती. याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रूपाली चाकणकर यांनी सकाळी मशीनची पूजा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी यांनी रुपाली चाकणकरांविरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा- शिवीगाळ, दमदाटी, धमकी; माझ्याशिवाय आहे कोण? अजित पवार गटाच्या आमदाराची दादागिरी, VIDEO)

सोलापुरात ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न

सोलापूरच्या सांगोला तालुक्यात ईव्हीएम मशीन जाळल्याची घटना समोर आली आहे. बागलवाडी येथे दादासो मनोहर चळेकर या व्यक्तीने 12.30 वाजेच्या सुमारास ईव्हीएम मशीन जाण्याचा प्रयत्न केला. निवडणूक कर्मचाऱ्यांनी तातडीने पाणी ओतून आग विझवली. याबाबत सांगोला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान

  • लातूर - 55.38 टक्के
  • सांगली - 52.56 टक्के
  • बारामती - 45.68 टक्के
  • हातकणंगले - 62.18 टक्के
  • कोल्हापूर - 63.71 टक्के
  • माढा - 50 टक्के
  • उस्मानाबाद (धाराशिव) - 52.78 टक्के
  • रायगड - 50.31 टक्के
  • रत्नागिरी -सिंधुदुर्ग - 53.75 टक्के
  • सातारा - 54.11 टक्के
  • सोलापूर - 49.17 टक्के

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com