जाहिरात
This Article is From May 02, 2024

सावधान! या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्हाला येतेय जास्त झोप, डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश

Excessive Sleep Causes: अपुऱ्या झोपेमुळे आरोग्याशी संबंधित विविध समस्या निर्माण होतात. त्याच प्रकारे आवश्यकतेपेक्षा अधिक झोप येणे, हे देखील चांगले संकेत नाहीत. शरीरातील व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जास्त प्रमाणात झोपे येते, हे तुम्हाला माहिती आहे का?

सावधान! या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्हाला येतेय जास्त झोप, डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश
तुम्हाला देखील अति प्रमाणात झोप येते (Photo Credit- Canva)

Excessive Sleep Causes In Marathi: दिवसभराच्या थकव्यानंतर पुरेशा प्रमाणात झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. पण गरजेपेक्षा अधिक प्रमाणात झोप येणे देखील आरोग्यासाठी घातक ठरू शकते. शरीरामधील कित्येक व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात झोप येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अधिक झोप येण्यामागील प्रमुख कारण शरीरातील 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता देखील असू शकते.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तुम्हाला देखील अति प्रमाणात झोप येते?

आताच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमध्ये बहुतांश लोक झोप न येण्याच्या समस्येचा सामना करताहेत. झोप न येण्याच्या आजारात निद्रानाश असे म्हटले जाते. तर या उलट शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता, खराब जीवनशैली आणि तणावामुळे देखील काही लोक अधिक प्रमाणात झोप येण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. तुम्हाला देखील अति प्रमाणात झोप येत असेल तर सावध व्हा आणि वेळीच यावर योग्य तो तोडगा काढवा. अति झोप येण्याच्या समस्येपासून कशी मिळवावी सुटका? जाणून घेऊया सविस्तर... 

(नक्की वाचा: सावधान! वायू प्रदूषणामुळे हा गंभीर आजार होण्याचा मोठा धोका - रीसर्च)

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अधिक प्रमाणात झोप येते? (Which Vitamin Deficiency Causes Excessive Sleep?)

  • 'व्हिटॅमिन डी' केवळ हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नसते, तर अति प्रमाणात येणाऱ्या झोपेवर नियंत्रण मिळवण्यासाठी देखील हे जीवनसत्त्व महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. 
  • 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे अति प्रमाणात झोप येऊ शकते. शरीरामध्ये 'व्हिटॅमिन डी'चे प्रमाण कमी असेल तर सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोनच्या स्तरावर परिणाम होऊ शकतो. हे दोन्ही हार्मोन्स झोप नियंत्रणात ठेवण्यामध्ये मोठी भूमिका बजावतात. 
  • कोवळ्या उन्हाच्या कमी संपर्कात येणे तसेच पौष्टिक आहाराच्या अभावामुळे 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता निर्माण होऊ शकते. 

(नक्की वाचा: बेलीफॅटपासून ते पचन प्रक्रियेपर्यंतच्या सर्व समस्या होतील दूर, या आसनांचा करा सराव)

व्हिटॅमिन डीचे प्रमुख स्त्रोत

कोवळे ऊन तसेच आहारामध्ये मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.   

शरीरामध्ये ही लक्षणे आढळल्यास वेळीच व्हा सावध

अति प्रमाणात झोपल्यास शारीरिक थकवा आणि मानसिक तणाव या समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या शरीरामध्ये ही लक्षणे आढळल्यास सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधवा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती वैद्यकीय चाचणी करावी व रिपोर्ट्सनुसार औषधोपचार करावेत.   

जास्त झोप येण्यामागील प्रमुख कारण शरीरातील 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता असू शकते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी 'व्हिटॅमिन डी'युक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा.   

VIDEO: वाढत्या उष्णतेमुळे वैयक्तिक आयुष्यात वादळ, मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक वास्तव

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com