
Cardamom And Clove Benefits: किचनमधील गरम मसाल्यामुळे केवळ स्वयंपाकाची चव वाढत नाही तर आरोग्यासही अगणित लाभ मिळतात. या लेखाद्वारे आपण लवंग आणि वेलचीचे एकत्रित सेवन करण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. लवंगातील अँटी-बेक्टेरिअल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म संसर्गापासून शरीराचे संरक्षण करण्याचे काम करतात. तर वेलचीमुळे शरीर डिटॉक्स होते आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. लवंग-वेलची एकत्रित खाल्ल्यास तोंडाला येणारा दुर्गंध दूर होण्यासह पचनप्रक्रिया सुधारण्यास आणि तणाव दूर होण्यास मदत मिळू शकते. लवंग आणि वेलची शरीरासाठी एकप्रकारे सुपरफुडप्रमाणे कार्य करते. वेलची लवंग एकत्रित खाण्याचे फायदे जाणून घेऊया...
लवंग आणि वेलची एकत्रित खाण्याचे फायदे (Cardamom And Clove Benefits In Marathi)
पचनप्रक्रिया
- लवंग आणि वेलची एकत्रित खाल्ल्यास पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल.
- लवंगमुळे गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
- वेलचीमुळे पोटातील जळजळ आणि अॅसिडिटीची समस्या कमी होईल.
(नक्की वाचा: Cardamom Benefits: या लोकांनी रोज एक वेलची नक्कीच खावी, कारण..)
ऊर्जा आणि ताजेतवाने वाटणे
- कित्येकदा आपल्याला थकवा आणि आळस जाणवतो.
- आळस, थकवा दूर करण्यासाठी लवंग-वेलची एकत्रित खावी.
- लवंग आणि वेलचीच्या सुगंधाने ताजेतवाने वाटेल.
(नक्की वाचा: Cardamom Benefits: रिकाम्या पोटी वेलची खाल्ल्यास काय होते?)
सर्दी आणि खोकला
- घशाची खवखव, सर्दी-खोकल्यामुळे त्रस्त असाल तर नियमित लवंग-वेलचीचे सेवन करणं रामबाण उपाय ठरू शकतो.
- लवंगमुळे कफ पातळ होईल आणि वेलचीमुळे घशातील खवखव कमी होईल.
- दोन्ही गोष्टी एकत्रित चावून खाल्ल्यास सर्दी-खोकल्यापासून सुटका होईल.
(नक्की वाचा: Green Cardamom Water: हिरव्या वेलचीचे पाणी प्यायल्यास काय होते?)
तोंडाला येणारा दुर्गंध
- तोंडाला येणाऱ्या दुर्गंधापासून सुटका हवी असल्यास लवंग आणि वेलची खावी.
- लवंगातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे तोंडातील जंतूंची समस्या दूर होते.
- वेलची-लवंग नॅचरल माउथफ्रेशनरप्रमाणे काम करते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world