जाहिरात

ना सोशल मीडिया, ना ऑनलाइन अपडेट; दूरदर्शनवर कार्यक्रमांची अशी दिली जायची माहिती

Viral Video: सोशल मीडियावर दूरदर्शनवरील अँकरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दूरदर्शनवरील कार्यक्रमांची माहिती त्या काळामध्ये कशा पद्धतीने दिली जायची, हे या व्हिडीओद्वारे पाहायला मिळत आहे.

ना सोशल मीडिया, ना ऑनलाइन अपडेट; दूरदर्शनवर कार्यक्रमांची अशी दिली जायची माहिती
दूरदर्शनवर अशी दिली जायची कार्यक्रमांची माहिती

Viral Video: डिजिटलच्या युगामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एखादा कार्यक्रम, सिनेमा किंवा वेब सीरिजच्या रिलीजपूर्वी त्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार प्रमोशन केले जाते. संबंधित कार्यक्रमाचा संपूर्ण तपशील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो. कधी पोस्ट-रिल्स तर कधी प्रोमोद्वारे कार्यक्रमाच्या लाँचबाबतची माहिती प्रेक्षकांना दिली जाते. पण पूर्वी दूरदर्शनच्या काळामध्ये अशा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. कारण ते इंटरनेटचे युगच नव्हते. त्यामुळे आठवडाभर दूरदर्शनवर कधी आणि कोणते कार्यक्रम दाखवले जातील, याची माहिती आठवड्यातून एकदाच आणि विशेष म्हणजे एकाच कार्यक्रमाद्वारे दिली जायची. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

DD2 कार्यक्रमाचे वेळापत्रक  

दर आठवड्याला दूरदर्शन वाहिनीवर एक विशेष कार्यक्रम प्रसारित होत असे. 'DD2 Programming Schedule' (कार्यक्रमाचे वेळापत्रक) असे त्या कार्यक्रमाचे नाव होते. सुरुवातीस अशा प्रकारचा कार्यक्रम आठवड्यातून एकदाच प्रसारित केला जात असे. व्हायरल व्हिडीओमध्ये साडी नेसलेली अँकर आठवडाभरातील कार्यक्रमांची माहिती प्रेक्षकांना देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर नियमित एका स्लॉटमध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम प्रसारित केले जाऊ लागले, ज्याद्वारे कार्यक्रमांचा दिवस-वेळेची माहिती दिली जायची. 'स्टार रेट्रो' नावाच्या इंस्टाग्राम हँडलने दूरदर्शन वाहिनीवरील जुना व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक अँकर 1 जानेवारी 1994 रोजी प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देत ​​आहे.

(नक्की वाचा: स्वातंत्र्याची भावुक करणारी कहाणी, 50 वर्षे रुग्णालयात असणाऱ्या भावासाठी ताईचा संघर्ष)

नव्वदीच्या दशकातील काळ

या व्हायरल व्हिडीओमधील अँकरचा साधा-सुंदर लुक पाहून नव्वदीच्या दशकातील मुलांना त्यांचे बालपण आठवले. एका युजरने लिहिले आहे की,"हा व्हिडीओ पाहून बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या". आणखी एका युजरने लिहिलंय की, "शाहरुख खानची मालिका बंद झाल्यानंतर खूप दुःख झाले होते".  

(नक्की वाचा: अबब! कारमध्ये शिरला 6 फुट लांब महाकाय अजगर, ड्रायव्हरला फुटला घाम VIRAL VIDEO)

VIDEO : विकास झाला, पण प्रवास सुखकर झालाय का? 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
केस ओढले-कपडे फाडले, मुख्याध्यापिका-शिक्षिकेमध्ये फ्री स्टाइल हाणामारी; VIDEO VIRAL
ना सोशल मीडिया, ना ऑनलाइन अपडेट; दूरदर्शनवर कार्यक्रमांची अशी दिली जायची माहिती
Aamras Dosa recipe video viral on instagram
Next Article
अतिशय युनिक, अतिशय वेगळा आमरस डोसा; VIDEO वर नेटिझन्सच्या 'तिखट' कमेंट्स