जाहिरात

Pune News: बिबट्याची धास्ती; बड्या IT कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन जारी

Pune Leopard News: कॉग्निझंटने कंपनीने कर्मचाऱ्यांना सुरक्षितता आणि काळजी घेण्यासंबंधी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

Pune News: बिबट्याची धास्ती; बड्या IT कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन जारी
Instagram - @framesbyfozail

Pune News: पुणे शहराच्या विविध भागांत अलीकडे बिबट्या दिसल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि वन अधिकाऱ्यांनी देखील या नोंदी घेतल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या कॉग्निझंटने (Cognizant) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खबरदारी म्हणून अॅव्हायझरी जारी केली आहे.

सध्या हिंजवडी परिसरात बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याची घटना घडलेली नसली, तरी भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कंपनीने ही पाऊल उचलले आहे. कॉग्निझंटने कंपनीने कर्मचाऱ्यांना सुरक्षितता आणि काळजी घेण्यासंबंधी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

(नक्की वाचा-  Pune News: पाठलाग, शिवीगाळ अन् कारची तोडफोड; पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर जोडप्यासोबत भयंकर घडलं; कारण...)

कॉग्निझंटच्या सल्लागार सूचनांमधील महत्त्वाचे मुद्दे

एकटे फिरणे टाळा :  कंपनी परिसरात अंधार पडल्यानंतर किंवा सूर्योदयापूर्वी एकटे फिरणे पूर्णपणे टाळावे.
वाहनांचा वापर करा : पायी जाण्याऐवजी कंपनीची वाहतूक सेवा, कारपूलिंग किंवा शेअर कॅब्स वापरावी.
शॉर्टकट टाळा : जंगलालगतच्या किंवा एकाकी भागातून शॉर्टकट घेऊ नयेत.
सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळवा : संशयास्पद प्राणी हालचाल दिसल्यास तत्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करावे.
बिबट्या दिसल्या : बिबट्या दिसल्यास घाबरू नये, शांत राहावे आणि पळू नये. कारण अचानक केलेली कोणतीही हालचाल त्या प्राण्याला चिथावणी देऊ शकते.

(नक्की वाचा-  श्रीलंकेला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूला होणार अटक? काय आहे प्रकरण?)

कंपनीने कर्मचाऱ्यांना उशीरा संध्याकाळी, रात्री आणि पहाटे फेज-2 कॅम्पसमध्ये जाणे टाळण्याचा सल्लाही दिला आहे. स्थानिक प्रशासन आणि वन अधिकाऱ्यांनी बिबट्या दिसण्याच्या वाढत्या घटनांमुळे कॉर्पोरेट कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा उपाययोजना करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com