जाहिरात
44 minutes ago

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झाशी मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी (19 नोव्हेंबर) भीषण आग (Jhansi Medical College Fire) लागली. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आग भडकली. या दुर्घटनेमध्ये 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानतर हॉस्पिटलमध्ये चेंगराचेंगरी देखील झाली. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खिडक्या फोडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले.  

गद्दार खेकड्याला घरी बसवा, आमदार रोहित पवार यांची तानाजी सावंत यांच्यावर घणाघात


परंडा विधानसभा मतदारसंघातून राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आले होते. तानाजी सावंत यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा बोलले आहेत, त्यांना कायमस्वरूपी घरी बसावा. त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून भ्रष्ट गद्दारांना घरी बसवा अशी घणाघाती टीका केली आहे. ॲम्बुलन्स घोटाळा, शासकीय गोळ्या औषधांमध्ये केलेला घोटाळा या सर्व घोटाळ्यांची चौकशी करावी अशी मागणी करावी अशी मागणी केली आहे.

गद्दार खेकड्याला घरी बसवा, आमदार रोहित पवार यांची तानाजी सावंत यांच्यावर घणाघात


परंडा विधानसभा मतदारसंघातून राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आले होते. तानाजी सावंत यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा बोलले आहेत, त्यांना कायमस्वरूपी घरी बसावा. त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून भ्रष्ट गद्दारांना घरी बसवा अशी घणाघाती टीका केली आहे. ॲम्बुलन्स घोटाळा, शासकीय गोळ्या औषधांमध्ये केलेला घोटाळा या सर्व घोटाळ्यांची चौकशी करावी अशी मागणी करावी अशी मागणी केली आहे.

मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबईत ८ ड्रग्स व्यसनमुक्ती केंद्रे उभी करणार.

बीएमसी स्कूल अपग्रेड करण्यासाठी प्रयत्न करणार.

महिलांवर, लहान मुलींवर जे अत्याचार होतायत त्यानुषंगाने वन स्टॉप सेंटर म्हणजे एकच केंद्रात आम्ही सगळ्यांना मदतीच्या अनुषंगाने जे जे करता येईल ते करणार.

वर्किंग महिलांसाठी मुंबई सुरक्षित हॉस्टेल उभी करणार.

मच्छीमारासाठी आम्ही कोल्ड स्टोरेज सेंटर उभारणार. मार्केट स्थापन करणार. 

हॉस्पिटलमध्ये मुफ्त औषध दिली जावीत यासाठी योजना सुरू करणार.

२५ लाखांचे विमा कवच तसेच ब्लड ऑन कॉल म्हणजे एका फोनवर रक्त मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार.

पुण्यात चंद्रकांत पाटलांसह दोन प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगााची नोटीस

पुण्यात चंद्रकांत पाटलांसह दोन प्रमुख उमेदवारांना नोटीस.  कोथरूडमधील तिन्ही उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून नोटीस. उमेदवारांनी दिलेल्या दैनंदीन खर्चात तफावत आढळल्याने कारणे दाखवा नोटीस.  महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठवण्यात आली नोटीस. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर निर्बंध ठेवण्यासाठी 40 लाख खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. याच खर्चात तफावत असल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद

रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद. गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने स्वीकारला.  मुंबईतील जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून विविध परवानग्या घेण्यात आल्याप्रकरणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार रवींद्र वायकर  आणि त्यांच्या पत्नीविरोधात दाखल प्रकरण बंद करण्याबाबत मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगरदंडादाधिकारी न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे, वायकर यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद करून आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात दाखल केला होता

झाशीच्या मेडिकल कॉलेजला लागलेल्या आगीची घटना हृदय पिळवटून टाकणारी- मोदी

झाशीच्या मेडिकल कॉलेजला लागलेल्या आगीची घटना हृदय पिळवटून टाकणारी- मोदी

नागपूरमध्ये दोन कुरिअर कर्मचाऱ्यांकडून 1 कोटी 64 लाख किमतीचे दागिने जप्त

नागपूरमध्ये दोन कुरिअर कर्मचाऱ्यांकडून 1 कोटी 64 लाख किमतीचे दागिने जप्त. विमानाद्वारे पार्सलमधून आले होते दागिने. गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी केला पाठलाग. इमामबाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना. सिरसपेठ येथील रहिवासी शेख सलीम शेख वजीर आणि कुणाल राऊत या दोघांना घेतले चौकशीसाठी ताब्यात. दागिने सराफा व्यापाऱ्याचे असल्याचे दोघांनी सांगितले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने नागपूर पोलिस सर्व अँगल्स नी तपास करीत आहेत.

मनसेला ठाकरे गटाचा दणका; नांदगावमध्ये मनसे उमेदवाराचा ठाकरे गटात प्रवेश

नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातील मनसे अधिकृत उमेदवार अकबर सोनावाला यांनी  थेट उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.  ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर सोनावला कालपासून धात्रक यांच्या प्रचारात सक्रिय झाले. तालुक्यातील परिस्थिती बदलण्यासाठी आपण ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे सोनावाला यांनी सांगितले.

सोलापूर : मोहोळ विधानसभा मतदारसंघात अभिजीत ढोबळे यांची तटस्थ भूमिका

सोलापूर : मोहोळ विधानसभा मतदारसंघात अभिजीत ढोबळे यांची तटस्थ भूमिका, ढोबळे यांनी कार्यकर्त्यांवर निर्णय सोपवला. मोहोळ मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे हे विश्वासात न घेत नसल्यामुळे अभिजित ढोबळे नाराज. अभिजीत ढोबळे यांनी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेऊन भूमिका केली जाहीर. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांच्या प्रचारापासून अभिजीत ढोबळे यांचा गट राहणार लांब. मोहोळ विधानसभा मतदारसंघात अभिजीत ढोबळे यांची मोठी ताकद, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मोहोळ साठी अभिजीत ढोबळे होते इच्छुक.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com