जाहिरात
10 hours ago
मुंबई:

Ind vs Eng Semi Final Live Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज वानखेडे स्टेडियममध्ये सेमी फायनलचा सामना रंगला. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. भारतासाठी सलामीवीर संजू सॅमसनने 42 चेंडूत 89 धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये 7 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश आहे. अभिषेक शर्मा (9),इशान किशन (39),शिवम दुबे (43),सूर्यकुमार यादव (11),हार्दिक पंड्या (27), तिलक वर्माने (21) धावा केल्या. या धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 253 धावांपर्यंत मजल मारली.

त्यानंतर या धावांचं टार्गेट गाठणाऱ्या इंग्लंडच्या संघाने भारताची दमछाक केली होती. जेकबचं वादळी शतक फेल ठरलं. बेथलने शेवटच्या षटकापर्यंत इंग्लडना विजयाच्या दिशेनं नेलं होतं. परंतु, हार्दिक पंड्याने 19 व्या षटकात भेदक गोलंदाजी केली. त्यानंतर दुबेच्या गोलंदाजीवर बेथल 105 धावांवर रन आऊट झाला आणि अतितटीचा हा सेमीफायनलचा सामना भारताने खिशात घातला. भारताने इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये पराभव करून टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये एन्ट्री केली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनलचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 8 मार्चला होणार आहे. 

इंग्लंडसाठी फिल सॉल्ट (5),जॉस बटलर (25),हॅरी ब्रुक (7),जेकब बेथल (105),टॉम बँटन (17),विल जॅक्स (35),सॅम करण (18),जेमी ओव्हरटन नाबाद 2, जोफ्रा आर्चर नाबाद 19 धावा केल्या. भारतासाठी अर्शदीप सिंगने 1,हार्दिक पंड्याने (2),जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

Ind vs Eng Live : बेथल-जॅक्सची भागिदारी थांबली, जॅक्स तंबूत परतला

पॉवर प्ले मध्ये इंग्लंडचे 4 विकेट्स गेल्यानंतर जेकब बेथल आणि विल जॅक्सने चौकरा षटकारांचा पाऊस पाडला आहे. दोघांची भागिदारी शंभरी पार झाली होती. परंतु, अर्शदीप सिंगने विल जॅक्सला 35 धावांवर झेलबाद केलं. 15 षटकानंतर इंग्लंडची धावसंख्या 184-5 वर पोहोचली आहे.

Ind vs Eng Live : जेकब बेथलची वादळी खेळी

इंग्लंडचे चार फलंदाज बाद झाल्यानंतर जेकब बेथलने 19 चेंडूत 51 धावा करून अर्धशतक झळकावलं. बेथलने वानखेडे मैदानात गगनचुंबी षटकार ठोकले. बेथल आणि विक जॅक्स मैदानात सावध खेळी करून इंग्लंडला विजयाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Ind vs Eng Live : इंग्लंडच्या संघाला चौथा धक्का

 बुमराहने कर्णधार हॅरी ब्रुकला स्वस्तात माघारी पाठवलं. बुमराहने ब्रुकला 7 धावांवर बाद केलं. 5 षटकानंतर इंग्लंडची धावसंख्या  45-2 वर पोहोचली होती. त्यानंतर अक्षर पटेलने टॉम बॅन्टनला 17 धावांवर बाद केलं. 9 षटकात इंग्लंडची धावसंख्या शंभरी पार झाली आहे. 9 षटकानंतर इंग्लंडची धावसंख्या 114-4 वर पोहोचली आहे. 

Ind vs Eng Live : इंग्लंडचे 3 स्टार फलंदाज बाद, कोणाल्या मिळाल्या विकेट्स?

भारताने इंग्लंडला 254 धावांचं आव्हान दिल्यानंतर इंग्लंडचा संघ मैदानात उतरला. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले. हार्दिक पंड्याने फिल सॉल्टला अवघ्या 5 धावांवर बाद केलं. त्या पाठोपाठ बुमराहने कर्णधार हॅरी ब्रुकला स्वस्तात माघारी पाठवलं. बुमराहने ब्रुकला 7 धावांवर बाद केलं. 5 षटकानंतर इंग्लंडची धावसंख्या  45-2 वर पोहोचली होती. त्यानंतर सहाव्या षटकात वरुण चक्रवर्तीने जॉस बटलरला 25 धावांवर बाद केलं. त्यामुळे इंग्लंडच्या संघ पॉवर प्ले मध्ये 68-3 वर पोहोचला आहे.

Ind vs Eng Live Updates : इंग्लंडला 254 धावांचं मोठं आव्हान, भारतीय फलंदाजांची तुफानी खेळी

भारताने इंग्लंडला 254 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. भारतासाठी संजू सॅमसन (89), इशान किशन (39), शिवम दुबे (43), हार्दिक पंड्या (27), अक्षर पटेलने 21 धावा केल्या. या धावांच्या जोरावर भारताने 253 धावांपर्यंत मजल मारली. 

Ind vs Eng Live Updates : फक्त 11 धावांनी संजू सॅमसनचं शतक हुकलं

अभिषेक शर्मा आणि इशान किशन बाद झाल्यानंतरही संजूने धावांचा पाऊस पाडणं सुरुचे ठेवलं. संजूने तुफानी अर्धशतकी खेळी केल्यानंतर षटकारांचा पाऊस पाडला. पण विल जॅक्सनच्या गोलंदाजीवर संजू 89 धावांवर बाद झाला. 14 षटकानंतर भारताची धावसंख्या 167-3 वर पोहोचली आहे.

IND vs ENG Live : षटकार ठोकून संजू सॅमसनने झळकावलं अर्धशतक, इशान झाला बाद, दुबे चमकला

अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. संजू सॅमसनने वानखेडेत अप्रतिम फलंदाजी करून अर्धशतक ठोकलं आहे. संजूने 64 धावांवर नाबाद खेळत आहे. भारताची धावसंख्या शंभरी पार झाली आहे. 9 षटकानंतर भारताची धावसंख्या 112-2 वर पोहोचली आहे. इशान किशनने 18 चेंडूत 39 धावा कुटल्या. आदिल रशिदने इशानची विकेट घेतली. त्यानंतर शिवम दुबेनं दोन गगनचुंबी षटकार ठोकले. 12 षटकानंतर भारताची धावसंख्या 145-2 वर पोहोचली आहे.

IND vs ENG Live : संजू-इशानचा पॉवर प्ले मध्ये धमाका

भारताचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशनने पॉवर प्ले मध्ये चैकार षटकारांचा पाऊस पाडला आहे. 7 षटकानंतर भारताची धावसंख्या 76-1 वर पोहोचली आहे.

IND vs ENG Live : अभिषेक शर्मा बाद, कोणी घेतली विकेट?

भारताचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा 9 धावांवर बाद झाला. विक जॅक्सने अभिषेकला बाद केलं. 4 षटकानंतर भारताची धावसंख्या 45 वर 1 बाद आहे. मैदानात संजू सॅमसन आणि इशान किशन फलंदाजी करत आहेत.

Ind vs Eng Live : भारताचे सलामीवीर फलंदाज मैदानात

IND vs ENG Live : भारताचे सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा मैदानात उतरले आहेत. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरच्या पहिल्या षटकात भारताने बिनबाद 12 धावा केल्या आहेत. संजूने एक चौकार आणि एक षटकार ठोकून इंग्लंडच्या गोलंदाजांचं स्वागत केलं आहे.

IND vs ENG Live : कशी आहे इंग्लंड संघाची प्लेईंग 11?

इंग्लंडच्या संघात फिलिप सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद या खेळाडूंचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. 

IND vs ENG Live : कशी आहे भारताची प्लेईंग 11?

भारतीय क्रिकेट संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह यांचा प्लईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. 

Ind vs Eng Live : रोहित शर्माने सूर्यकुमारला वानखेडेत काय सल्ला दिला?

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्डकपचा सेमी फायनलचा थरार थोड्याच वेळाता वानाखेडे मैदानात सुरु होणार आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी भारताचा स्टार फलंदाज आणि वर्ल्डकप विजेता कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादवची वानखेडे मैदानात भेट घेतली. यो दोघांच्या भेटीमुळं प्रतिस्पर्धी संघ इंग्लंडचे धाबे दणाणले आहेत.

Ind vs Eng Live : इंग्लडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्डकपचा सेमी फायनलचा थरार आज मुंबईच्या वानखेडे मैदानात रंगत आहे. नाणेफेकीचा कौल पार पडला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत थोड्याच वेळात फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

Ind vs Eng Live : सचिनचा फॅन सुधीर कुमार सिंग वानखेडेत पोहोचला

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्डकपचा सेमी फायनलचा थरार थोड्याच वेळात रगंणार आहे. तत्पूर्वी सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता सुधीर कुमार सिंग वानखेडेत दाखल झाला आहे. सुधीर तिरंगा फडकावून मैदानात भारतीय संघासाठी चिअर अप करताना दिसत आहे.

Ind vs Eng Live : थोड्याच वेळात पाहा भारत-इंग्लंडच्या सेमी फायनलचा थरार

पावसाची शक्यता नाही

AccuWeather च्या रिपोर्टनुसार, आज गुरुवारी मुंबईत पावसाची शक्यता अजिबातच नाहीय. सेमी फायनलसाठी रिझर्व्ह पिचचा वापर टूर्नामेंटमध्ये दोन वेळा केला गेला आहे. जेव्हा वेस्ट इंडिजने इंग्लंड विरोधात 196 धावांचा डोंगर रचला होता आणि जेव्हा इटली ने नेपाळला 123 धावांवर गारद करून सामना 10 विकेट्सने खिशात घातला होता.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com