जाहिरात

Vaibhav Sooryavanshi: "त्याने पँट काढून...", वैभवला संघात जागा न मिळाल्याने रवी शास्त्री संतापले, म्हणाले...

Vaibhav Sooryavanshi News: भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला संघात स्थान न दिल्याबद्दल संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे.

Vaibhav Sooryavanshi: "त्याने पँट काढून...", वैभवला संघात जागा न मिळाल्याने रवी शास्त्री संतापले, म्हणाले...

भारतीय क्रिकेट संघाला आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला आहे. यानंतर आयपीएल 2026 मध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्यामुळे आता माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघ व्यवस्थापनाला धारेवर धरले आहे.

रवी शास्त्रींचे अजब विधान

'सोनी स्पोर्ट्स नेटवर्क'वर समालोचन आणि विश्लेषण करताना रवी शास्त्री यांनी वैभव सूर्यवंशीच्या निवडीबाबत अत्यंत आक्रमक मते मांडली. यादरम्यान त्यांनी त्यांच्या नेहमीच्या बिनधास्त आणि काहीशा अजब शैलीत प्रतिक्रिया दिली. रवी शास्त्री यांनी म्हटलं की, "अरे यार, तो खेळायलाच हवा होता. त्याला आयर्लंडच्या दौऱ्यातच संघात संधी द्यायला हवी होती. तिथली खेळपट्टी संथ होती आणि चेंडू थांबून येत होता. तिथली मैदानंही लहान होती, त्याने चेंडू थेट छतावर मारले असते. त्याने तिथे धुव्वा उडवला असता, समोरच्यांची पँट काढली असती. त्याला तिथे नक्कीच खेळवायला हवे होते."

पाहा VIDEO

आयपीएल 2026 चा हिरो अजूनही पदार्पणाच्या प्रतीक्षेत

रवी शास्त्री यांच्या मते, वैभव सूर्यवंशी हा सध्याच्या भारतीय संघातील सर्वात मोठा 'एक्स फॅक्टर' आहे. वैभवने नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2026 च्या हंगामात अप्रतिम कामगिरी करत तब्बल 776 धावा कुटल्या होत्या आणि अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले होते. त्याआधी भारताला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवून देण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

(नक्की वाचा-  हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार? आयपीएल ट्रेडच्या चर्चांवर 'CSK'च्या सीईओंचे स्पष्टीकरण)

"त्याने आयपीएलमध्ये जगातील प्रत्येक अव्वल गोलंदाजाची धुलाई केली आहे. असा एकही वेगवान गोलंदाज नव्हता ज्याला त्याने सोडले नाही. तरीही तुम्ही अशा खेळाडूला फक्त बेंचवर बसवून ठेवत आहात," अशा शब्दांत शास्त्री यांनी व्यवस्थापनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

वैभवला संघात जागा द्या

रवी शास्त्री यांनी वैभवच्या खेळाचे विश्लेषण करताना सांगितले की, त्याचे कमी वय हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. तो अवघा 15 वर्षांचा आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा मानसिक दबाव किंवा दडपण नाही. त्याच्यात तरुणाईची प्रचंड ऊर्जा आहे आणि तो कोणालाही घाबरत नाही. जर सुरुवातीच्या 2-3 ओव्हर्समध्ये त्याचा फटका बसला, तर तो संघाला अशी सुरुवात देईल ज्याचा फायदा संपूर्ण मिडल ऑर्डरला होईल. संघ व्यवस्थापनाला त्याच्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनवावीच लागेल," असे स्पष्ट मत शास्त्री यांनी व्यक्त केले.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com