3 months ago

Maharashtra MLA Oath-Taking Ceremony LIVE : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आजपासून विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांना हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आज राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी होईल,  शनिवारी आणि रविवारी दोन दिवसात 288 आमदारांचा शपथविधी पार पडेल. त्यानंतर सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. 

शनिवार सकाळी 11 वाजता विधानसभा सुरू होईल. यावेळेस विधानसभा नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. भारतीय जनता पक्षाचे आमदार चैनसुख संचेती हे पहिल्या क्रमांकावर शपथ घेतील. त्यानंतर जयकुमार रावळ, माणिकराव कोकाटे आणि पाचव्या क्रमांकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होईल.  त्यानंतर  विधानसभा अध्यक्ष निवड कार्यक्रम जाहीर केला जाईल. रविवारी ही सभागृह सुरू राहणार आहेत. त्यात नवीन सदस्य आमदार शपथ घेतील. तसंच दुपारी 12 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत राहील.  

Dec 07, 2024 21:56 (IST)

Live Update : पुण्यातील हडपसर परिसरातील वैदुवाडीतील गोडाऊनला भीषण आग

पुण्यातील हडपसर परिसरातल्या वैदुवाडीतील गोडाऊनला भीषण आग 

वैदुवाडीत असलेल्या भंगारच्या गोडाउनला भीषण आग 

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट 

पुणे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन कुलिंगच काम करत आहे 

या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

Dec 07, 2024 21:10 (IST)

Live Update : रत्नागिरीत सीएनजीची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गळती, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

रत्नागिरी शहरातील डी मार्ट समोर शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महामार्गावर सीएनजीची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून वायू गळती झाली. यावेळी आवाज झाल्याने परिसरात  घबराट उडाली. मात्र टँकर चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.. दरम्यान घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेचा बंब घटनास्थळी दाखल झाला होता..

Dec 07, 2024 20:54 (IST)

Live Update : रत्नागिरीत सीएनजी टँकरमधून गळती

रत्नागिरीत सीएनजी टँकरमधून गळती

रात्री 8 च्या सुमारास डी मार्ट समोर अचानक प्रचंड मोठा आवाज झाला

सीएनजीची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून  वायू गळती होण्यास सुरुवात 

रत्नागिरी नगर परिषदेचा बंब घटनास्थळी दाखल

Dec 07, 2024 20:53 (IST)

Live Update : चंपाषष्ठीनिमित्त मुळगावच्या खंडोबा मंदिरात गर्दी! खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा

चंपाषष्ठीनिमित्त खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी बदलापूर जवळच्या मुळगाव इथल्या डोंगरावरील खंडोबाच्या मंदिरात आज भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात.

बदलापूर जवळच्या मुळगाव इथं डोंगरावर खंडोबाचं मंदिर आहे. डोंगर चढून या मंदिरात जाण्यासाठी साधारण अर्ध्या तासाचा अवधी लागतो. या मंदिरात वर्षभर भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र चंपाषष्ठीच्या दिवशी या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी अक्षरशः रांगा लागतात. चंपाषष्ठीचा उत्सव या मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. आजही भाविकांनी चंपाषष्ठी निमित्त या मंदिरात मोठी गर्दी केल्याचा पाहायला मिळालं.

Advertisement
Dec 07, 2024 20:34 (IST)

Live Update : 'आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी...'; फडणवीसांचं ट्विट करून पवारांना आवाहन

Dec 07, 2024 18:37 (IST)

Live Update : चंपाषष्टी निमित्त दैठणे गुंजाळ येथील खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेश्वराच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली होती. येथील खंडोबा प्रती जेजुरी म्हणून ओळखला जातो. तर दरवर्षी चंपाषष्ठी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या मंदिरात खंडेरायाची मुर्तीसह एका बाजूला म्हाळसा तर दुसऱ्या बाजूला बानू यांची पाषाणातील आकर्षक मूर्ती आहे. परिसरातील अनेक भाविकांची या खंडेश्वरावर श्रद्धा आहे. नगर जिल्ह्यासह बीड, नाशिक, पुणे, मुंबई येथुन अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.

Advertisement
Dec 07, 2024 18:29 (IST)

Live Update : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात धुळी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात धुळी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

शहरातील बांधकामे आणि मेट्रोच्या कामामुळे धुळीच्या प्रदूषणात वाढ  

प्रदूषण नियंत्रीत करण्याची नागरिकांची मागणी

Dec 07, 2024 16:56 (IST)

Live Update : मधुकर पिचड यांच्यावर शासकिय इतमामात सलामी देत अखेरचा निरोप

आदिवासी नेते मधुकर पिचड यांना त्यांच्या मुळगावी राजूर येथे शासकिय इतमामात सलामी देत अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी श्रद्धांजली देण्यासाठी शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार हेमंत सावरा, आमदार नरहरी झिरवळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सत्यजित तांबे, स्नेहलता कोल्हे, खा. राजाभाऊ वाजे,  खा. भाऊसाहेब वाकचौरे,खा. भास्कर भगरे, माजी खा. सदाशिव लोखंडे, भानुदास मुरकुटे, माजी मंत्री वसंत पुरके, मा.मंत्री शिवाजीराव मोघे,  राज्यातील अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते. 

Advertisement
Dec 07, 2024 13:57 (IST)

Maharashtra Assembly Special Session: विशेष अधिवेशनाचे कामकाज संपले, 173 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. आज विधानसभेच्या 173 आमदारांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली असून उद्या 11 वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात होणार आहे. 

Dec 07, 2024 13:43 (IST)

विधानसभेतील आजचं कामकाज स्थगित, उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा सुरुवात होणार

विधानसभेतील आजचं कामकाज स्थगित, उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा सुरुवात होणार

Dec 07, 2024 13:03 (IST)

Madhukar Pichad News: मधुकर पिचड यांचे पार्थिव पक्षकार्यालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या निधनानंतर आज त्यांचं पार्थिव अकोले शहरातील त्यांच्या पक्ष कार्यालया पुढे ठेवण्यात आलेले होते. या ठिकाणी हजारोंची गर्दी त्यांच्या चाहता वर्गाची दर्शनासाठी झाल्याची पाहायला मिळाली यावेळेस पिचड साहेब अमर रहे अमर रहे च्या घोषणा परिसरात देण्यात आल्या.

Dec 07, 2024 11:34 (IST)

Hasan Mushrif News: राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांनी 'अल्लाह साक्ष' घेतली शपथ

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली असून नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी ईश्वर साक्ष ऐवजी अल्ला साक्ष म्हणत शपथ घेतली. तसेच भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. 
https://youtube.com/shorts/xtJ6385kvS8?si=SK3q_Q28FFLw-rGb

Dec 07, 2024 11:30 (IST)

Oppositon MLA Leave Assembly Session: विरोधी पक्षातील आमदार आज शपथ घेणार नाहीत

विधानसभा आमदारांचा शपथविधी सुरु असतानाच एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नवव्या क्रमांकावर शपथ घेणार होते, मात्र सभागृहात उपस्थित नसल्याने त्यांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंसह विरोधी पक्षाचे आमदार सभागृहातून बाहेर पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. 

Dec 07, 2024 11:20 (IST)

Devendra Fadnavis Oath Ceremony: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी, सभागृहात 'जय श्री राम'च्या घोषणा

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली असून नवनिर्वाचित आमदार शपथ घेत आहेत. 288 आमदारांपैकी भारतीय जनता पक्षाचे नेते चैनसुख संचेती यांनी पहिली शपथ घेतली. त्यानंतर जयकुमार रावळ, माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचव्या क्रमांकावर शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर सभागृहात जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा करण्यात आल्या. 

Dec 07, 2024 11:11 (IST)

Maharashtra MLA Oath Ceremony: नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात, 9 डिसेंबरला होणार अध्यक्षांची घोषणा

राज्याच्या नव्या सरकारच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कळंबेकर सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ घेतील.  आज आणि उद्या सर्व आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. 

Dec 07, 2024 11:09 (IST)

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी हस्तांदोलन, गुलाबराव पाटलांकडे मात्र पाठ

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी हस्तांदोलन, गुलाबराव पाटलांकडे मात्र पाठ

Dec 07, 2024 10:58 (IST)

Aditya Thackeray Meet Devendra Fadnavis: आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सचिन अहिर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटीलही उपस्थित होते. 

Dec 07, 2024 10:53 (IST)

MLA Oath Ceremony: भगवे, गुलाबी फेटे घालून नवनिर्वाचित आमदार विधानभवनात दाखल

राज्यभरातील नवनिर्वाचित आमदार शपथविधीसाठी विधानभवनात दाखल होत आहेत. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी घातलेले भगवे फेटे अन् राष्ट्रवादीच्या आमदारांनी घातलेल्या गुलाबी फेट्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले.

Dec 07, 2024 10:34 (IST)

Nilesh Rane On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा पक्ष कोकणातून साफ झाला: निलेश राणेंचा टोला

१० वर्षानंतर जनतेने मला ही संधी दिली. मी जनतेचे आभार मानतो. अजून खुप काम करायच आहे. निलेश राणे सगळं करणार आहे.  गेल्या १० वर्षात मतदार संघाला ओसाड पाडण्याचं काम मागच्या आमदारांनी केले. दोन्ही भाऊ महाराष्ट्रासाठी काय करु शकतात हे दाखवण्याची वेळ आली आहे.

उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कोकणातून साफ झाला त्यांना कोकणात जागा नाही. कोकणी माणसाला भावनिक करुन मत घेतात आणि ओसाड ठेवतात.  कोकणातील माणसांनी वचपा काढला आहे.  शेतकरी आत्महत्या बाबत मी सर्व आढावा घेणार आहे. राहुल गांधी येऊन काय करणार?  नेगेटिव्ह राजकारण करण्याचं काम राहुल गांधी करतात. देशाच नाव खराब करतात, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. 

Dec 07, 2024 10:00 (IST)

Maharashtra Assembly Special Session: नवनिर्वाचित आमदार विधानभवनात दाखल

विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी राज्यभरातील नवनिर्वाचित आमदार विधानभवनात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार बाळा नर विधानभवनात दाखल झाले आहेत. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्यासह नवनिर्वाचित आमदार किरण सामंत,  सुलभा गायकवाड, श्रीजया चव्हाण आदी आमदार विधानसभेत दाखल झाले आहेत. 

Dec 07, 2024 09:55 (IST)

Nana Patole On Ajit Pawar: . 'ना खाऊंगा ना खाने दूंगा...' नाना पटोलेंनी अजित पवारांसह भाजपला डिवचले

अजित पवार यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची लवादाने बेकायदेशीर जप्ती असल्याचे सांगून मुक्तता केल्याबद्दल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आता केंद्र सरकार ला लक्ष्य केले आहे. 'ना खाऊंगा ना खाने दूंगा.. 'हा मंत्र मोदीजींच्या माणसासाठी नाही या शब्दांत त्यांनी केंद्र सरकार वर टीका केली आहे.

Dec 07, 2024 08:03 (IST)

Mobile Blast: मोबाईलचा भीषण स्फोट, 1 ठार

तुम्ही मोबाईल फोनचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चिंताजनक ठरू शकते. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरेगावबांध येथे मोबाईलचा स्फोट झाला आहे. मोटारसायकलवर जातांना मोबाईल फोनचा स्फोट होऊन एकाचा दुर्देवी मृत्यु तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. सुरेश भिकाजी संग्रामे या मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.कुरखेडा तालुक्यातील कसारी जी.प.प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते.त्यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आहे.

Dec 07, 2024 07:52 (IST)

maharashtra Assembly Special Session: तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 287 नवनिर्वाचित प्रतिनिधी घेणार आमदारकीची शपथ

विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात

आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेच्या क्रमवारीनुसार शपथ दिली जाणार

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष वगळता विधानसभेचे उर्वरित एकूण 287 नवनिर्वाचित प्रतिनिधी घेणार आमदारकीची शपथ

आज काही आमदार शपथ घेणार तर उद्या उर्वरित आमदार शपथ घेणार

पहिल्यांदा निवडून आलेले 78 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार

हंगामी विधानसभा अध्यक्ष यांनी काल शपथ घेतल्यानंतर आज विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्षांकडून आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदावर भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती