जाहिरात

अंबरनाथमध्ये 16 वर्षीय मुलीचं मुस्लीम तरुणाकडून अपहरण?, पोलिसांकडून गुन्हा दाखल, मात्र तपास संथगतीने

अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह अंबरनाथ पश्चिमेच्या शिवनगर परिसरात वास्तव्याला होती. 29 जुलै रोजी दुपारच्या सुमारास ती घरातून गेली, ती पुन्हा परत आलीच नाही.

अंबरनाथमध्ये  16 वर्षीय मुलीचं मुस्लीम तरुणाकडून अपहरण?, पोलिसांकडून गुन्हा दाखल,  मात्र तपास संथगतीने

निनाद करमरकर, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं 19 वर्षीय मुस्लीम तरुणाने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आठवडा उलटूनही पोलीस तपास थंडच आहे. त्यामुळे मुलीचं काही बरं वाईट झाल्यास कोण जबाबदारी घेणार? असा उद्विग्न सवाल मुलीच्या पालकांनी केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह अंबरनाथ पश्चिमेच्या शिवनगर परिसरात वास्तव्याला होती. 29 जुलै रोजी दुपारच्या सुमारास ती घरातून गेली, ती पुन्हा परत आलीच नाही. तसेच तिचा फोन देखील बंद होता. त्यामुळे अखेर तिचं कुणीतरी अपहरण केल्याची तक्रार घरच्यांनी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात नोंदवली. 

(नक्की वाचा-  'लाडकी बहीण' योजनेच्या बहाण्याने आली अन् नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत पळून गेली )

यानंतर तिला त्याच परिसरातील एका 19 वर्षीय मुस्लीम तरुणाने पळवून आजमगड इथं नेल्याचं तिच्या पालकांना समजलं. याबाबतची माहिती देखील त्यांनी पोलिसांना दिली. मात्र आज तब्बल 7 दिवस उलटूनही पोलिसांचा तपास अतिशय थंडपणे सुरू आहे, असा आरोप मुलीच्या पालकांनी केला याहे. 

(नक्की वाचा - गटारी पार्टी जीवावर बेतली; 5 मित्र गाडीसह नदीत बुडाले, एकाचा मृत्यू तर एकजण बेपत्ता)

उद्या माझ्या मुलीचं काही बरं वाईट झालं, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल मुलीच्या आईने उपस्थित केला आहे. तर सध्या घडत असलेल्या घटना पाहता पोलिसांनी लवकरात लवकर या मुलीला शोधून काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक पवार यांनी केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com