सौरभ वाघमारे, प्रतिनिधी
Central Railway Solapur Devision Latest Update : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर स्टेशनजवळ 1922 साली बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन रोड ओव्हर ब्रिज (ROB) अखेर रविवारी 14 डिसेंबर 2025 रोजी पाडण्यात येणार आहे. या कामासाठी रेल्वेकडून सकाळी 8.30 ते रात्री 7.30 असा 11 तासांचा मेगा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सोलापूर यार्डातील सर्व मेन लाईन (Up And Down) आणि लुपलाईनवर वाहतूक बंद राहणार आहे.
या ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द होणार आहेत. तस काही गाड्या शॉर्ट-टर्मिनेट तसेच उशिराने चालणार असून प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. सोलापूरकरांची महत्त्वाची असलेले सोलापूर-पुणे, पुणे-सोलापूर दरम्यान धावणारी इंटरसिटी अर्थात इंद्रायणी एक्सप्रेस रविवार 14 डिसेंबर रोजी कुर्डूवाडी पर्यंतच असणार आहे. यामुळे सोलापूरकर प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. बागलकोट–म्हैसूर एक्सप्रेस 14 डिसेंबर रोजी रात्री 12.30 वाजता (00:30) बागलकोटहून सुटेल.
14 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आलेल्या 9 गाड्या
-
होस्पेट–सोलापूर डेमू
-
सोलापूर–पुणे डेमू
-
सोलापूर–होस्पेट डेमू
-
वाडी–सोलापूर डेमू
-
सोलापूर–दौंड डेमू विशेष
-
हडपसर–सोलापूर डेमू
-
दौंड–कलबुर्गी विशेष
-
सोलापूर–कलबुर्गी विशेष
-
कलबुर्गी–दौंड विशेष
मार्ग बदललेल्या 9 गाड्या
म्हैसूर–पंढरपूर गोलगुंबझ (13 डिसेंबर) गदग–हुबळी–मिरज–पंढरपूरमार्गे धावेल.
पंढरपूर–म्हैसूर गोलगुंबझ (14 डिसेंबर) — मिरज–लोनढा–गदगमार्गे धावेल.
विजापूर–रायचूर—विजापूर पॅसेंजर होटगी–वाडी–सोलापूर बायपास मार्गे धावेल.
तिरुअनंतपुरम–मुंबई एक्सप्रेस — गुंटकल–होस्पेट–हुबळी–मिरज–पुणेमार्गे धावेल.
बंगळुरू–मुंबई उद्यान (13 डिसेंबर) — हुबळी–मिरज–पुणेमार्गे धावेल.
मुंबई–बंगळुरू उद्यान (14 डिसेंबर) — पुणे–मिरज–गुंटकलमार्गे धावेल.
एलटीटी–विशाखापट्टणम (14 डिसेंबर) — कुर्डूवाडी–लातूर–विकाराबादमार्गे धावेल.
पुणे–सिकंदराबाद शताब्दी — कुर्डूवाडी–लातूर–विकाराबादमार्गे धावेल.
नक्की वाचा >> 18 महिन्यांतच कॅमेरा फेस केला! 100 जाहिराती, साऊथ इंड्रस्ट्रिही गाजवली, कोण आहे 'धुरंधर'ची सारा अर्जुन?
शॉर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्या
- पुणे–सोलापूर इंटरसिटी (इंद्रायणी एक्सप्रेस)
- 14 डिसेंबर रोजी कुर्डूवाडीपर्यंतच येणार; तेथूनच पुण्याकडे परतणार.
- हसन–सोलापूर एक्सप्रेस 13 डिसेंबर रोजी कलबुर्गीपर्यंतच येऊन तिथून परतणार.
- उशिराने सुटणाऱ्या गाड्या (13–14 डिसेंबर)
- कन्याकुमारी–पुणे एक्सप्रेस — 2 तास उशिराने कन्याकुमारी येथून सुटेल.
- पुणे–कन्याकुमारी — 1 तास उशिराने पुणे येथून सुटेल.
- कोणार्क एक्सप्रेस (दोन्ही दिशांनी) — 2 तास उशिराने सुटेल.
- सिकंदराबाद–पुणे शताब्दी — 2 तास उशिराने सिकंदराबाद येथून सुटेल.
15 डिसेंबरला 2.5 तासांचा ब्लॉक
- सकाळी 11:10 ते 13:40
- रद्द गाड्या :
- सोलापूर–होस्पेट डेमू
- होस्पेट–सोलापूर डेमू
- सोलापूर–पुणे डेमू
नक्की वाचा >> Shocking News : कांद्यावर औषध फवारणीसाठी शेतात गेली, पती सोबत असतानाच महिलेचा जागीच मृत्यू! काय घडलं?
उशिराने सुटणाऱ्या गाड्या :
रायचूर–विजापूर पॅसेंजर – 30 मिनिटे रायचूर येथून सुटेल.
विजापूर–रायचूर पॅसेंजर – 30 मिनिटे विजापूर येथून सुटेल.
पुणे–सोलापूर इंद्रायणी – 30 मिनिटे पुणे येथून सुटेल.
सोलापूर–पुणे इंद्रायणी – 30 मिनिटे सोलापूर येथून सुटेल.
16–17 डिसेंबर (UP लाईन ब्लॉक – ३.५ तास)
दुपारी 2:10 ते 5:40
विजापूर–रायचूर पॅसेंजर होटगीपर्यंत येईल. आणि तिथूनच पुढे रायचूरकडे रवाना होईल.
कन्याकुमारी–पुणे एक्सप्रेस 30 मिनिटे उशिराने कन्याकुमारी येथून सुटेल.
18–19 डिसेंबर (DN लाईन ब्लॉक – ३.५ तास)
दुपारी 4 ते रात्री 7.30
सोलापूर–हसन एक्सप्रेस — 20 मिनिटे उशीर सोलापूर येथून सुटेल.
बागलकोट–म्हैसूर एक्सप्रेस — 40 मिनिटे उशीर बागलकोट येथून सुटेल.