मोसिन शेख, प्रतिनिधी
Chatrapati Sambhaji Nagar News Today : छत्रपती संभाजीनगरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.वाळूज महानगरातील वडगाव कोल्हाटी परिसरात तळ्यात मासेमारीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील दोन जणांवर काळाने घाला घातला. हे दोघेही नात्याने ऐकमेकांचे मेहुणे होते. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. सिद्धार्थ शिवाजी दिवेकर आणि विनोद जाधव अशी या मेहुण्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शिवाजी दिवेकर व त्यांचे मेहुणे विनोद जाधव हे दोघे ३ एप्रिल रोजी तळ्यात मासेमारीसाठी गेले होते.मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांना संशय आला.कुटुंबीयांनी तळ्याकडे जाऊन पाहणी केली असता काठावर त्यांचे कपडे आणि दुचाकी आढळून आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
नक्की वाचा >> Ratnagiri News: जगबुडी नदीच्या पुलावर केमिकलचा टँकर पलटी, मुंबई-गोवा हायवेवरून जाणाऱ्या प्रवाशांनी सावध राहा
पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, पण..
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.शोधमोहीम राबवत अग्निशमन दलाने सिद्धार्थ दिवेकर यांचा मृतदेह बाहेर काढला.दरम्यान,विनोद जाधव यांचा अद्याप शोध लागलेला नसून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा >>Pune News: पुण्यातील शेतकऱ्यांच्या जीव धोक्यात? महावितरणचा अनागोंदी कारभार, शेतातच झाला एका शेतकऱ्याचा मृत्यू
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world