जाहिरात

Sambhajinagar: आधी दारू पाजली..नंतर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला, परप्रांतीय महिलेनं आरडाओरडा करताच..

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका परप्रांतीय महिलेवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा धक्कादायक उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

Sambhajinagar: आधी दारू पाजली..नंतर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला, परप्रांतीय महिलेनं आरडाओरडा करताच..
Sambhajinagar Women Physical Assault Case

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका परप्रांतीय महिलेवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा धक्कादायक उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. वैजापूर शहरातील रस्त्यावर मनमाडकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभ्या असलेल्या 23 वर्षीय पीडित महिलेला लिफ्ट देण्याचा बहाणा करत नराधमांनी तिला वासनेची शिकार बनवले.वैजापूर-येवला रस्त्यावरील गवडगाव हद्दीत एका निर्जन घरात नेऊन या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.

महिला मनमाडकडे जाण्यासाठी उभी होती, नंतर..

या धक्कादायक घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.वैजापूर पोलिसात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैजापूर येथील आरोपी देवचंद भागवत आणि किरण पेटारे यांना अटक करण्यात आली आहे.महिला तिच्या पतीसोबत वैजापूर,मनमाड आणि नाशिक परिसरात मजुरीचे काम करते.19 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता ती वैजापूर येथील येवला रोडवर मनमाडकडे जाण्यासाठी उभी होती. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी 'आम्हीही मनमाड चाललोय,तुला सोडतो'असे सांगून तिला विश्वासात घेतले.

नक्की वाचा >> Jalgaon News: 408 बँक खाते, भुसावळच्या तरुणाच्या खात्यावर 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम, देशातील मोठं रॅकेट उघड

महिलेनं कशीबशी सुटका केली 

पीडिता काही समजण्याच्या आतच तिला वाहनावर बसवून ते थेट गवडगाव येथील एका बंद घरात घेऊन गेले आणि तिच्यावर अत्याचार केला.आरोपींनी आधी तिला दारू पाजण्याचा प्रयत्न केला.अत्याचारानंतर पीडितेने जीवाच्या आकांताने विरोध करत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ जमा झाले लोकांची चाहूल लागताच दोन्ही नराधम दुचाकीवरून फरार झाले.या भीतिदायक प्रसंगातून कशीबशी सुटका झाल्यानंतर पीडितेने थेट पोलीस ठाणे गाठलं आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com