Mumbai Metro: मुंबई मेट्रो प्रशासनाने दिव्यांग प्रवाशांसाठी घेतला मोठा निर्णय! मासिक पासमध्ये दिली 'इतकी' सवलत

Mumbai Metro Latest News Update : मुंबई मेट्रो प्रशासनाने दिव्यांग प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रो लाईन-3 वर मासिक प्रवास पासवर 25 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Metro Latest News
मुंबई:

Mumbai Metro Latest News Update : मुंबई मेट्रो प्रशासनाने दिव्यांग प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रो लाईन-3 वर मासिक प्रवास पासवर 25 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सुविधा जवळपास दहा दिवसांत लागू होणार आहे. समावेशक प्रवासाच्या दिशेने हा एक स्वागतार्ह टप्पा मानला जात आहे. मात्र, या निर्णयामागे दिव्यांग प्रवाशांच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणारे ज्येष्ठ पत्रकार आणि आरोग्यदूत दिपक कैतके यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. कैतके यांनी काही आठवड्यांपूर्वीच मुंबई मेट्रो प्रशासन व राज्य शासनाकडे दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात सवलत देण्याची मागणी केली होती.

दिपक कैतके यांनी एक्सवर काय म्हटलंय?

त्यांच्या या मागणीला अखेर मेट्रो प्रशासनाने दुजोरा देत सवलतीची घोषणा केली आहे. तरीदेखील, कैतके यांनी आता दिव्यांग प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन सवलत टक्केवारीनुसार वाढवावी अशी नव्याने मागणी केली आहे. कैतके यांनी मुंबई मेट्रो 3 (MumbaiMetro3) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक्सवर टॅग करत म्हटलंय, "महोदय, दिव्यांग प्रवाशांना मिळणारी सवलत त्यांच्या दिव्यांगत्वाच्या टक्केवारीनुसार निश्चित करण्यात यावी, ही नम्र विनंती आहे. मेट्रो 3 अद्याप पूर्णपणे सुलभ नसल्याने प्रवासासाठी सहकारी घ्यावा लागतो. त्यामुळे कृपया किमान 50 टक्के सवलत देण्याचा विचार करावा.”

नक्की वाचा >> Railway Mega Block Latest Update: 'या' तारखेचा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द! कारण वाचून खुश व्हाल

मेट्रो लाईन-3 अद्याप पूर्णपणे दिव्यांगसुलभ नसल्याने प्रवासासाठी सहाय्यक घ्यावा लागतो, त्यामुळे केवळ 25 टक्क्यांची सवलत अपुरी ठरत असल्याचे मत दिव्यांग प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. मेट्रो प्रशासनाने समावेशक प्रवासाचा संकल्प मांडला असला, तरी आता दिव्यांग प्रवाशांना अधिक न्याय्य आणि व्यावहारिक सवलत देण्यासाठी सरकार व मेट्रो प्रशासनाने एकत्र येऊन निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> बॉलिवूडच्या फेमस अभिनेत्रीच्या पित्यानं स्वत:च्याच बहिणीशी केलं होतं लग्न! माधुरी दीक्षितवरही होता क्रश