जाहिरात

बॉलिवूडच्या फेमस अभिनेत्रीच्या पित्यानं स्वत:च्याच बहिणीशी केलं होतं लग्न! माधुरी दीक्षितवरही होता क्रश

Prakash Padukone Viral Interview :  बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या पित्याने त्यांच्याच चुलत बहिणीसोबत लग्न केलं होतं. बॉलिवूडच्या हायएस्ट पेड अॅक्ट्रेसमध्ये या अभिनेत्रीचा दबदबा आहे.

बॉलिवूडच्या फेमस अभिनेत्रीच्या पित्यानं स्वत:च्याच बहिणीशी केलं होतं लग्न! माधुरी दीक्षितवरही होता क्रश
Deepika Padukone Father News
मुंबई:

Prakash Padukone Viral Interview :  बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या पित्याने त्यांच्याच चुलत बहिणीसोबत लग्न केलं होतं. बॉलिवूडच्या हायएस्ट पेड अॅक्ट्रेसमध्ये या अभिनेत्रीचा दबदबा आहे. ती अभिनेत्री आहे दीपिका पादुकोण..दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण हे माजी बॅडमिंटन प्लेअर म्हणून प्रसिद्ध आहेत. एका जुन्या मुलाखतीत प्रकाश पादुकोण यांनी म्हटलं होतं की, त्यांनी त्यांच्या दुसऱ्या चुलत बहिणीसोबत लग्न केलं होतं. दीपिका पादुकोणची आई उज्जला पादुकोण असं प्रकाश यांच्या पत्नीचं नाव आहे.

रिपोर्ट्सनुसार, दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, एक वेळ अशीही होती की, जगातील नंबर वन बॅडमिंटन खेळाडू असतानाही नॅशनल चॅम्पियनशिप हारलो होतो. त्यांनी म्हटलंय की, हे मागील नऊ वर्षांत पहिल्यांदा घडलं होतं, जेव्हा ते एखाद्या सामन्यात पराभूत झाले होते. यामुळे खूप नैराश्यात गेलो होतो. पण लवकरच स्वत:ला सांभाळलं. खेळात विजय-पराभव असतो, हे नंतर समजून घेतलं.

प्रकाश पादुकोणने 1989 मध्ये बॅडमिंटनमधून घेतली निवृत्ती

प्रकाश पादुकोण यांनी म्हटलं होतं की, त्यांनी त्यांच्या दुसरी चुलत बहिण उज्जलासोबत लग्न केलं आणि त्यानंतर ते कोपेनहेगन (डेनमार्कला) गेले. तिथे त्यांनी नोकरी मिळाली होती. ते 1986 पर्यंत तिथेच राहिले. त्याचवर्षी दीपिकाचा जन्म झाला. त्यांनी 1989 मध्ये बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली, असंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं. ते म्हणाले होते की, मी माझी दुसरी चुलत बहिण उज्जलासोबत लग्न केलं आणि आम्ही कोपेनहेगनला गेलो. कारण मला तिथे नोकरी मिळाली होती. आम्ही 1986 पर्यंत तिथेच राहिलो. त्याचदरम्यान दीपिकाचा जन्म झाला होता. मी 1989 मध्ये निवृत्ती घोषित केली.

नक्की वाचा >> 'मिनी तिरुपती' मंदिरात चेंगराचेंगरी! एकादशीला 25000 भाविकांची गर्दी उसळली, 10 जणांचा जीव गेला, तर..

प्रकाश पादुकोण यांना होता माधुरी दीक्षितवर क्रश

वर्ष 2016 मध्ये एका मुलाखतीत दीपिका पादुकोणने म्हटलं होतं की, तिचे वडील प्रकाश पादुकोण यांना माधुरी दीक्षितवर मोठा क्रश होता. जेव्हा तिच्या वडिलांना माधुरीच्या लग्नाची खबर लागली, तेव्हा त्यांनी स्वत:ला बाथरुममध्ये बंद केलं होतं. दीपिकाने मजेशीर कमेंट करत म्हटलं होतं की, हा किस्सा त्यांच्या घरात दिर्घकाळ एक जोक बनून राहिला. जेव्हा प्रकाश पादुकोण बाथरूममधून बाहेर आले, तेव्हा ते नाराज असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यावेळी कुटुंबातील लोकांना हसू आवरलं नाही. आम्ही विचार केला की, ते कदाचित माधुरीच्या लग्नाच्या बातमीमुळं रडले असावेत.

नक्की वाचा >> "दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसं आली, सर्व मराठीच, पण..", उद्धव ठाकरेंनी भाजपची केली पोलखोल!

Listen to the latest songs, only on JioSaavn.com