जाहिरात

Akola News: अकोला महापालिकेत शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ, 25 शिवसैनिक राजीनामा देण्याच्या तयारीत, कारण काय?

अकोला महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या तब्बल 25 शिवसैनिकांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

Akola News: अकोला महापालिकेत शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ, 25 शिवसैनिक राजीनामा देण्याच्या तयारीत, कारण काय?
Akola Municipal Corporation Political News

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News Today : अकोला महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या तब्बल 25 शिवसैनिकांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. अकोला महानगरपालिकेत 80 नगरसेवकांच्या सभागृहातून एकूण 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. त्यापैकी भाजपचे 4,काँग्रेसचे 2,वंचित बहुजन आघाडीचा 1 आणि शिवसेना ठाकरे गटाचा 1 स्वीकृत नगरसेवक निवडला जाणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून उपशहर प्रमुख प्रकाश वानखडे यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.शिवसेना उपनेते तथा बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी वानखडे यांना उमेदवारी देऊ,असे सांगत कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितल्याचेही बोलले जात आहे.त्यानुसार प्रकाश वानखडे यांनी आवश्यक कागदपत्रांची तयारीही केली होती.मात्र शेवटच्या क्षणी पक्षाने काँग्रेसमधून दोन महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात दाखल झालेले विजय लंगोटे यांना स्वीकृत नगरसेवकपदासाठी उमेदवारी दिली.शिवसेना गटनेते विजय इंगळे यांनी लंगोटे यांच्या समर्थनाचे पत्र मनपा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केल्याने वानखडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.

नक्की वाचा >> अख्ख्या महाराष्ट्रात या बिझिनेस वुमनची चर्चा, 2467 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक, कोण आहेत अर्चना कुटे?

15 वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संताप

या निर्णयामुळे उपशहर प्रमुख प्रकाश वानखडे,युवा शहर उपप्रमुख अविनाश कोकरे,उत्तर झोन विभाग प्रमुख सतीश नागदिवे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. गेल्या 15 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.

नक्की वाचा >> Pune News : बारामतीत सुरु होता सर्वात घाणेरडा प्रकार, भिगवण रोडवरील 'त्या' लॉजवर छापा, परिसरात उडाली खळबळ

त्यामुळे पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले असून येत्या काही दिवसांत मुंबईतील मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन अकोल्यातील शिवसेना ठाकरे गटाचे सुमारे 25 पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पदाचा राजीनामा देणार माहिती समोर आली आहे.पक्षांतर्गत झालेल्या अन्यायाबाबत वरिष्ठ नेत्यांना जाब विचारणार असल्याचे प्रकाश वानखडे यांनी स्पष्ट केले आहे.या घडामोडींमुळे अकोला शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com