जाहिरात

Ratnagiri News: सावधान! कोकणात फिरायला जाताय? 'या' समुद्रकिनाऱ्यावर घडली धडकी भरवणारी घटना

देवगड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरावर गुरुवारी शोकाकुल वातावरण पसरले. येथील रहिवासी चेतन मोहन परब (35) यांचा समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला.

Ratnagiri News: सावधान! कोकणात फिरायला जाताय? 'या' समुद्रकिनाऱ्यावर घडली धडकी भरवणारी घटना
Sindhudurg Devgad Viral News Today

गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी 

Devgad Incident Today : देवगड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरावर गुरुवारी शोकाकुल वातावरण पसरले. येथील रहिवासी चेतन मोहन परब (35) यांचा समुद्राच्या उधाणाच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.ही हृदयद्रावक घटना बुधवारी मध्यरात्री 11 वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर-मिठमुंबरी मार्गावरील समुद्रकिनारी घडली.

मित्रांनी तरुणाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण..

​मिळालेल्या माहितीनुसार,चेतन परब हे बुधवारी रात्री आपल्या काही मित्रांसोबत कुणकेश्वर ते मिठमुंबरी दरम्यान असलेल्या समुद्रकिनारी खेकडे पकडण्यासाठी गेले होते. रात्रीच्या वेळी किनार्‍यावरील खडकांवरून जात असताना अचानक चेतन यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात कोसळले.
​सध्या समुद्राला मोठे उधाण आणि तीव्र लाटा असल्याने ते क्षणात पाण्याच्या शक्तिशाली प्रवाहाबरोबर खोल समुद्रात वाहून गेले.मित्रांनी त्यांना वाचवण्याचा आणि शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला.मात्र अंधार आणि उधाणाच्या लाटांमुळे त्यांना यश आले नाही.

नक्की वाचा >> High Protein Dhokla: वेटलॉस करायचंय? नेहमीचा ढोकळा खाणे सोडा, सकाळी नाश्त्याला खा 'हा' हाय प्रोटीन ढोकळा

संपूर्ण कुणकेश्वर गावावर शोककळा

चेतन परब यांच्या या अचानक जाण्याने कुणकेश्वर व आसपासच्या परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या चेतन यांच्या पश्चात:आई आणि वडील,पत्नी,एक लहान मुलगा असा मोठा परिवार आहे.कुटुंबातील कर्त्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कुणकेश्वर गावावर शोककळा पसरली आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com