जाहिरात

Akola News: अकोल्यात साकारली 3500 स्क्वेअर फुटांची भव्य रांगोळी, फक्त 16 तासांत साकारले 'ते' ऐतिहासिक चित्र

चक्रवर्ती सम्राट अशोक प्रवेशद्वारासमोर तब्बल ३५०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची भव्य रांगोळी साकारण्यात आली.

Akola News: अकोल्यात साकारली 3500 स्क्वेअर फुटांची भव्य रांगोळी, फक्त 16 तासांत साकारले 'ते' ऐतिहासिक चित्र
Samrat Ashok 3500 Square Foot Rangoli

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Samrat Ashok Jayanti 2026 : अकोला शहरात सम्राट अशोक यांच्या ऐतिहासिक २,३३० व्या जयंतीनिमित्त एक अनोखा आणि आकर्षक उपक्रम राबवण्यात आला. तिक्ष्णगत मल्टिपरपझ वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या पुढाकारातून पंचशील नगर आणि न्यू तापडिया नगर,खरप रोड परिसरातील चक्रवर्ती सम्राट अशोक प्रवेशद्वारासमोर तब्बल ३५०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची भव्य रांगोळी साकारण्यात आली.या रांगोळीमुळे परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.सम्राट अशोक यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करण्यासाठी ही विशेष रांगोळी तयार करण्यात आली असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कलाकृतीचे कौतुक केले.जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे परिसरात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून इतिहासाची आठवणही नव्या पिढीला करून देण्यात आली आहे. 

पावणेदोन क्विंटल रंग आणि १६ तासांची मेहनत..

या भव्य रांगोळीच्या निर्मितीसाठी कलाकार आणि स्वयंसेवकांनी तब्बल सोळा तास अखंड मेहनत घेतली.रांगोळी साकारताना सुमारे पावणेदोन क्विंटल रंगाचा वापर करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.रांगोळीमध्ये सम्राट अशोक यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे धम्मचक्र आणि बौद्ध धम्माचा संदेश कलात्मक पद्धतीने मांडण्यात आला आहे.

नक्की वाचा >> Pune News: शिरुर तालुका हादरला, मध्यरात्री नवरा-बायकोनं केला हवेत गोळीबार, नंतर असं काही घडलं..

मोठ्या आकारामुळे ही रांगोळी दूरवरूनही लक्ष वेधून घेत आहे.रंगांच्या आकर्षक संयोजनामुळे संपूर्ण परिसर रंगीबेरंगी झाला असून नागरिकांनी मोबाईलमध्ये या रांगोळीचे फोटो आणि व्हिडिओ टिपण्यासही मोठी गर्दी केली.अनेकांनी या रांगोळीला अकोल्यातील एक वेगळा आणि स्मरणीय उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले. 

‘बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद होणार का?

इतक्या मोठ्या आकाराची आणि आकर्षक रचना असलेली ही रांगोळी पाहून नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.या भव्य रांगोळीची ‘बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद होईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.आयोजकांच्या मते,अशा प्रकारचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच करण्यात आला.

नक्की वाचा >> "...मी येतोय", पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनं स्वत:ला संपवलं, Instagram वर लिहिला शेवटचा मेसेज, काय घडलं?

यामुळे सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमानाला चालना मिळाली आहे.जयंतीनिमित्त साकारलेल्या या कलाकृतीने सम्राट अशोक यांच्या शांतता,अहिंसा आणि धम्माच्या संदेशाची आठवण नागरिकांना करून दिली.दरम्यान,रांगोळी पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी होत असून हा उपक्रम अकोल्यातील जयंती उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com