जाहिरात

"...मी येतोय", पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनं स्वत:ला संपवलं, Instagram वर लिहिला शेवटचा मेसेज, काय घडलं?

एका आठवड्याआधीच सचिन आणि भारतीने त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला होता. भारतीच्या संशयास्पद मृत्यूच्या काही तासांनंतरच पती सचिनने ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवलं.

"...मी येतोय", पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनं स्वत:ला संपवलं, Instagram वर लिहिला शेवटचा मेसेज, काय घडलं?
Husband And Wife Suicide Case

Husband And Wife Suicide Case : राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून सर्वांना हादरवणारी घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकलेल्या सचिन कांटीवाल (26) आणि भारती मेघवाल (22) यांचा मृत्यू झाला. एका आठवड्याआधीच सचिन आणि भारतीने त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला होता. भारतीच्या संशयास्पद मृत्यूच्या काही तासांनंतरच पती सचिनने ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवलं. 10 मे रोजी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. याआधीच त्या दोघांचा मृत्यू झाला. 

आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर केली पोस्ट

आयुष्य संपवण्याआधी सचिनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, "तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी येतोय. मिस यू भारती. नाही जगू शकत. दिलेलं वचन पूर्ण केलं.मिस यू बेटा".सचिनचे वडील सुभाष यांनी आरोप केला आहे की,लग्नानंतरच दोघांमध्ये वादविवाद सुरु झाले होते.आज सकाळी सचिन जयपूरला गेला होता. त्यानंतर भारतीने स्वत:ला रुममध्ये बंद केलं. त्यानंतर सचिनचे वडील सुभाष यांनी भारतीच्या कुटुंबियांना या प्रकाराबाबत सांगितलं. 

नक्की वाचा >> Chandrapur News: प्रियकराने मोबाईल चार्जरच्या वायरने प्रेयसीचा गळा आवळला, पतीला सोडल्यानंतर काय काय घडलं?

भारतीचे कुटुंबीय घरी पोहोचल्यावर त्यांच्या समोर भयानक दृष्य होतं. भारतीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. भारतीचा मृतदेह खाली उतरवून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. सुभाष यांनी भारतीच्या मृत्यूबाबत सचिनला सांगितलं. त्यानंतर काही तासांनी सचिनने नवलगढच्या दुर्जनपुरा येथे ट्रेनसमोर उडी मारली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. 

नक्की वाचा >> Ratnagiri News: जगबुडी नदीच्या पुलावर केमिकलचा टँकर पलटी, मुंबई-गोवा हायवेवरून जाणाऱ्या प्रवाशांनी सावध राहा

भारतीच्या हत्येचा आरोप

पोलिसांनी भारतीचा मृतदेह चिडावा उप जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि सचिनचा मृतदेह नवलगढ जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला.भारतीचे वडील ओमप्रकाशने आरोप लावला आहे की, हुंड्यासाठी त्याच्या मुलीची हत्या करण्यात आली. भारतीच्या सासरची मंडळी तिच्यासोबत नेहमीच भांडण करायचे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com