मुंबई विद्यापीठातील ४० विद्यार्थिनींना विषबाधा; युवासेनेकडून पाहणी करत कुलगुरुंना पत्र

युवासेनेने कुलगुरु प्रा. डॉ. रविंद्र कुळकर्णी यांना ई मेलद्वारे पाठवून दुरध्वनीवर संपर्क साधला आणि प्रत्यक्ष पाहणी करुन आढळलेल्या त्रुटींची माहिती दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस येथील नूतन मुलींचे वसतिगृह येथे ४० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना अचानक पोटदुखीचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  मुलींना झालेला त्रास तेथे पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे झाली की तेथे लावण्यात आलेल्या वॉटर कूलरची स्वच्छता न राखल्यामुळे झाला? हे अद्याप समोर आलेले नाही. 

युवासेनेने या प्रकरणाची दखल घेत चौकशीची मागणी केली आहे. याबाबतचं निवेदन कुलगुरु प्रा. डॉ. रविंद्र कुळकर्णी यांना ई मेलद्वारे पाठवून दुरध्वनीवर संपर्क साधला आणि प्रत्यक्ष पाहणी करुन आढळलेल्या त्रुटींची माहिती दिली. त्यानुसार येथील पाण्याची तपासणी करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट सोमवारी दिला जाणार आहे. 

(नक्की वाचा - विखे शरद पवारांवर चिडले, थेट भिडले, चांगलेच सुनावले, नेमकं काय घडलं?)

Yuvasena Letter

तसेच पाच पैकी फक्त तीनच कुलर वापरात आहेत. तर उर्वरित दोन अजून कार्यान्वित नाही तर ते दोनही कूलर तातडीने वापरासाठी घेण्याच्या सूचना अभियंता विभागास देण्यात आल्या आहेत. शिवाय विध्यार्थ्यांना तातडीने औषधोपचार मिळावा यासाठी किमान एक डॉक्टर आरोग्य केंद्रात उपलब्ध असावा, अशी व्यवस्था करण्यात यावी अशा उपाय योजना तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

(नक्की वाचा-  क्षुल्लक कारणावरुन रिक्षा चालकाचा बाईकस्वारावर रॉडने हल्ला, डोंबिवलीत रिक्षा चालकाची मुजोरी)

युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे युवासेना पदाधिकारी मयुर पांचाळ, किसन सावंत,किरण पाठक आणि शिवसेना उपनेत्या शितल शेठ देवरुखकर यांनी घटनास्थळी भेट देऊन वॉर्डन डॉ. मधुरा कुलकर्णी तसेच अभियंता आणि बाधीत विद्यार्थिनिंची चर्चा देखील केली.

Advertisement

Topics mentioned in this article