जाहिरात

Mumbai News: 46 वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून काढली 5.5 KG वजनाची गाठ, यामागचं कारण वाचून थक्कच व्हाल

मानखुर्द येथील 46 वर्षीय महिलेला गेल्या दोन वर्षांपासून पोटाची वाढती सूज,बोथट पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास यासारख्या आरोग्याच्या तक्रारी होत्या.

Mumbai News:  46 वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून काढली 5.5 KG वजनाची गाठ, यामागचं कारण वाचून थक्कच व्हाल
5.5 kg Uterine Fibroid Surgery

Uterine Tumor In 46 Years Old Woman : मानखुर्द येथील 46 वर्षीय महिलेला गेल्या दोन वर्षांपासून पोटाची वाढती सूज,बोथट पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास यासारख्या आरोग्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय (राजावाडी रुग्णालय) येथील स्त्रीरोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात उपचार घेण्यास सुरूवात केली होती. या रूग्णाच्या गर्भाशयातून जवळपास 5.5 किलो वजन आणि 30 सेंटीमीटर आकाराची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले.

गर्भाशयातील गाठ (ट्युमर) असल्याचे निदान झाले

या रूग्णाची संपूर्ण वैद्यकीय इतिहास,शारीरिक तपासणी आणि आवश्यक तपासण्या करण्यात आल्या.या तपासणी दरम्यान रुग्णामध्ये 30 सेमी आकाराची गर्भाशयातील गाठ (ट्युमर) असल्याचे निदान झाले. ही गाठ जायंट लिओमायोमा (Giant Leiomyoma/ Fibroid) असल्याचा संशय होता. शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतर उद्भवू शकणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सर्व आवश्यक खबरदारी व नियोजन करण्यात आले. त्यानुसार रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 

नक्की वाचा >> Sangli News: अजित पवारांच्या NCP चा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, 'या' आमदाराच्या राजीनाम्याच्या मागणीने खळबळ

 ट्युमर हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीसाठी पाठवण्यात आला

स्त्री रोग विभागामार्फत करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेसाठी डॉ.स्वाधिना बी.मोहंती,डॉ.शालिनी बगारिया,डॉ.अरवा कांबळे आणि डॉ.काजल साळवी यांनी महत्वाची भूमिका बजावली.भूलतज्ज्ञ डॉ.छवी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्रेयश आणि डॉ.नेत्रा यांनी भूल देण्याची जबाबदारी सांभाळली. तसेच सर्जिकल स्टाफ नर्स नीलाक्षी गुरव आणि त्यांच्या टीमने शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले. 

नक्की वाचा >> Gadchiroli News: गडचिरोली हादरलं! आई-वडील होते शेतात, चार मुलं सती नदीवर गेली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

ट्युमरचा मोठा आकार आणि त्यामधील वाढलेली रक्तवाहिन्यांची जाळी यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली.शस्त्रक्रियेनंतर काढलेला 5.5 किलो ट्युमर हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.या चाचणीचा अंतिम अहवाल प्रतिक्षेत आहे.शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर विशेष काळजीपूर्वक उपचार करण्यात आले.शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी रूग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.मोठ्या आकाराच्या गर्भाशयातील गाठीची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com