पुण्यात सात वर्षांपूर्वी एका युगुलाला नग्न करून हत्या केलेल्या एका दुहेरी हत्याकांडाचा निकाल समोर आला असून या प्रकरणातील आरोपी सलीम शब्बीर शेख याची निर्दोष मुक्तता झाली आहे. लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडाचा पुणे सत्र न्यायालयात आज अंतिम फैसला सुनावण्यात आला. 2017 मध्ये भुशी धरणाच्या मागील डोंगरात सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरेंची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. चोरीच्या उद्देशाने या जोडप्याची हत्या झाली होती. आज या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाच्या अंतिम सुनावणीत आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. या हत्येप्रकरणी उज्वल निकामांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं होतं.
3 एप्रिल 2017 रोजी भुशी धरणाच्या मागील डोंगरात सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पुढील अडीच महिन्यांपर्यंत ही हत्या नेमकी कोणी केली याचा उलगडा झाला नव्हता. मात्र यातील एका आरोपीने हॉटेलमध्ये दारूच्या नशेत त्याच्या मित्राकडे याची वाच्यता केली. ही बाब एका खबऱ्याने पोलीस शिपायाला दिली अन् त्यानंतर या खुनाला वाचा फुटली.
नक्की वाचा - यशश्री इच्छेने दाऊदला भेटायला गेली होती? पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर उरण हत्याकांडांला वेगळं वळण
सात वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?
लोणावळ्यात दोन इंजिनियर विद्यार्थी सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे भुशी डॅम परिसरात फिरण्यासाठी गेले होते. मूळचे आग्राचे असलेले सलीम शब्बीर शेख आणि असिफ शेख यांनी रात्री 9 वाजता दोघांना भुशी डॅमजवळ पाहिले होते. यावेळी आरोपींजवळ धारदार शस्त्रही होते. आरोपींनी दोघांना अडवलं आणि आधी मुलाला कपडे काढण्यास सांगितलं. मुलाने स्वत:चे कपडे काढले. मात्र ज्यावेळी त्यांनी मुलीचे कपडे काढण्यास सांगितले तेव्हा मुलाने विरोध केला. आरोपींनी मुलाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. यानंतर मुलगी आरडाओरडा करू लागली. आरोपींनी मुलीलाही संपवलं. यानंतर आरोपींनी त्या दोघांचे हात आणि पाय बांधले, त्यांच्याकडून मोबाइल फोन घेतले आणि पळून गेले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world