Nashik News : तो मदतीसाठी ओरडत राहिला अन् भटक्या कुत्र्यांनी लचक तोडले, 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू 

Nashik News : सकाळी हसत-खेळत शाळेत गेलेल्या चिमुकल्या श्यामचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला श्यामचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना शोक अनावर झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Dog Attack News : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 5 वर्षीय लहानग्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील ममदापूर गावात ही घटना घडली आहे. श्याम मामराज राठोड असं या चिमुरड्याचं नाव आहे. कुत्र्यांनी अक्षरश: श्यामचे लचके तोडले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम सायंकाळच्या सुमारास शाळेतून घरी परतला. त्यावेळी त्याची आई शेतात कामाला गेली होती. श्याम नेहमीप्रमाणे शेतात आईकडे जाण्यास निघाला होता. त्याचवेळी भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. जवळपास त्याला मदत करणारे कुणीही नव्हते. तो मदतीसाठी ओरडत राहिला मात्र त्याला मदतच मिळाली. 

सकाळी हसत-खेळत शाळेत गेलेल्या चिमुकल्या श्यामचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला श्यामचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना शोक अनावर झाला. त्याच्या आईने तर अक्षरशः टाहो फोडल्याने उपस्थितांचे मन हेलावून गेले.

(नक्की वाचा-  Santosh Deshmukh Case: 'बोल सुदर्शन घुले बाप..., 'त्या' 15 व्हिडिओंची A to Z स्टोरी; वाचून काळजाचा थरकाप उडेल)

ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर हरणांचे कळप आहेत. या भागातील भटके कुत्रे हरणांवर हल्ले करून शिकार करून त्यांचे मास खातात. त्यातूनच या मोकाट कुत्र्यांनी श्यामला एकटे गाठून त्याच्यावर हल्ला केला.  

Advertisement

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा 

परिसरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न या निमित्ताने गंभीर  बनला आहे. या कुत्र्यांची आता माणसावर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंडोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

(नक्की वाचा- कशाला एवढं ताणता, जीवावर उठता का? तो फोन... आपल्यासोबत बरंवाईट होणार हे देशमुखांना कळलं होतं?)

श्यामच्या कुटुंबीयांना मदत द्यावी

श्यामच्या पालकांची परिस्थिती हालाखीची आहे. या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article