जाहिरात

93 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन

त्यांचा अंत्यविधी मिस्सा हा आजच गुरुवारी 25 जुलै 2024 सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास होली स्पिरीट चर्चमध्ये होणार आहे.

93 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन
वसई:

ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Senior Marathi Literary Father Francis Dibrito) यांचे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी 3.30 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) येथे ठेवण्यात येणार असून सायंकाळी 4 वाजल्यापासून नंदाखाल येथील होली स्पिरिट चर्च येथे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांचा अंत्यविधी मिस्सा हा आजच गुरुवारी 25 जुलै 2024 सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास होली स्पिरीट चर्चमध्ये होणार आहे. फ्रान्सिस दिब्रिटो यांचे साहित्य, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठें योगदान आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वासोबत, सामाजिक आणि पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा वसईतील नंदाखाल येथे मराठी ख्रिस्ती कुटुंबात 4 डिसेंबर, इ.स. 1943 मध्ये जन्म झाला. लेखक म्हणून त्यांनी मराठीत विविध विषयांवर लेखन केले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो 2020 मध्ये धाराशीव येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी पुणे येथे 1992 मध्ये झालेल्या पंधराव्या मराठी - ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले.

नक्की वाचा - 'लाडक्या खड्ड्या' तुझ्यासाठी काहीही; जीव मुठीत घेऊन बदलापुरकरांचा जीवघेणा प्रवास

फादर फ्रान्सिस दिब्रिटो कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू होते. मात्र त्यांची खरी ओळख साहित्यिक, पर्यावणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठविणारे कार्यकर्ते, सुजाण, सजग , सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणूनही आहे. त्यांच्या निधनाने  साहित्य विश्वासह वसई परिसरात शोककळा पसरली आहे.

Switch To Dark/Light Mode
Previous Article
Puja Khedkar : पूजा खेडकरचा खेळ खल्लास, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
93 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन
An incident of illegal abortion came to light in Nanded
Next Article
अवैध गर्भपात, पोलिसांना खबर, घटनास्थळी पोहोचले तर...