सूरज कसबे, पिंपरी चिंचवड
Pimpri Chinchwad Accident : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी गोडाऊन चौक परिसरात भरधाव वेगात आलेल्या एका जेसीबीने 6 वर्षीय चिमुकल्याला उडवले. या दुर्घटनेत लहानग्याचा मृत्यू झाला आहे. ऋषिकेश जयदेव खराडे या 6 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
घरातून कोथिंबीर आणायला गेलेल्या या चिमुरड्याला भरधाव वेगात आलेल्या जेसीबीने जोरदार धडक दिली. मृत ऋषिकेश याच्या मावशीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जेसीबी चालक राहुल श्रीरामचंद्र जाधव (26) याच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11 च्या सुमारास घरातून ऋषिकेश गोडाऊन चौकातील भाजीवाल्याकडे कोथिंबीर आणायला गेला होता. समोरून भरधाव वेगात आलेल्या जेसीबीने ऋषिकेशला जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला.
(नक्की वाचा- स्वप्न अधूरं राहिलं...हळदीच्या कार्यक्रमात नाचताना नववधुचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू)
स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्याला चौकातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ऋषिकेशच्या मावशीने याबाबत भोसरी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली.
(नक्की वाचा - Caste census : जातीनिहाय जनगणना: काँग्रेसच्या अजेंड्यावर सर्जीकल स्ट्राईक !)
त्यानंतर पोलिसांनी जेसीबी चालक राहुल श्रीरामचंद्र यादव याने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवल्याप्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 106 (1 ) , 281, मोटार वाहन कायदा कलम 184, 119/ 177 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.