Crime News : दोन्ही हाताचे पंजे कापले, मात्र आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन; नातेवाईकांचा संताप

पोलिसांनी त्यादृष्टीने भक्कम बाजूही मांडली. मात्र नव्या कायद्याच्या आधारावर न्यायालयाने आरोपींना जामीन दिला, असा दावा वाकड पोलिसांनी केला आहे. रोहन निमज, शुभम पवार आणि प्रशांत सकट अशी जामिनावर बाहेर पडलेल्या आरोपींची नावं आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी-चिंचवड

Pimpri Chinchwad Crime News : तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपींनी तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करत त्याच्या डाव्या हाताचा पंजा शरीरापासून वेगळा केला. तर उजवा हाताचा अर्धा पंजा देखील अर्धा कापला. अशा गंभीर हल्ल्यातील आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाल्याने पीडित तरुणाच्या नातेवाईकांनी पिंपरी-चिंचवड वाकड पोलीस स्टेशनसमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

नातेवाईकांच्या संतप्त पवित्र्यांतर वाकड पोलिसांना जाग आली आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. आम्ही हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी युक्तिवादही केला. पोलिसांनी त्यादृष्टीने भक्कम बाजूही मांडली. मात्र नव्या कायद्याच्या आधारावर न्यायालयाने आरोपींना जामीन दिला, असा दावा वाकड पोलिसांनी केला आहे. रोहन निमज, शुभम पवार आणि प्रशांत सकट अशी जामिनावर बाहेर पडलेल्या आरोपींची नावं आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा- Crime News: विवाहबाह्य संबंधातून दुहेरी हत्याकांड! पत्नीसह प्रियकराची हत्या, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ)

काय आहे प्रकरण?

डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या रोहनचे घराशेजारी राहणाऱ्या राहुल कणघरेसोबत पूर्वीचे वाद होते. त्यामुळे राहुल आणि रोहनमध्ये खटके उडायचे. यातून रोहन अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टीतून भांडण करायचा. काही दिवसांपूर्वीही (22 जून)  दोघांमध्ये असाच वाद झाला होता. या रागातून रोहनने त्याचे मित्र शुभम आणि प्रशांतच्या मदतीने राहुलला संपवण्याचा कट रचला. घरात बसलेल्या राहुलला विश्वासात घेऊन त्याने बाहेर बोलावलं. तिथून ते थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानशेजारी आले. तिथं दोन्ही मित्रांनी राहुलला पकडले अन् रोहनने शस्त्राने डोक्याच्या दिशेने वार केला. राहुलने डोक्यावरचा वार चुकवण्यासाठी हातमध्ये घातला. यात डावा पंजा शरीरापासून वेगळा झाला तर उजवा पंजा अर्धा कापला गेला. 

Advertisement

(नक्की वाचा- ड्रग्स प्रकरणातील 'बबनभाईला' VIP वागणूक! पोलीस ठाण्यात जेवणाची खास व्यवस्था)

याप्रकरणी वाकड पोलिसांनी रोहनसह दोन्ही मित्रांना बेड्या ठोकल्या. पण प्रकरण इतकं गंभीर असताना दुसऱ्याच दिवशी तिन्ही आरोपींना जामीन कसा काय मिळाला? हा प्रश्न उपस्थित करत नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी वाकड पोलीस स्टेशनसमोर आंदोलन छेडलं आहे. त्यानंतर वाकड पोलिसांना जाग आली. नातेवाईकांशी चर्चा करुन, नव्या कायद्यामुळे जामीन मिळाल्याचा दावा वाकड पोलिसांनी केला. मात्र या तिघांना पुन्हा एकदा अटक करण्याची परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचं वाकड पोलीस म्हणाले आ

Advertisement
Topics mentioned in this article