जाहिरात

Crime News: विवाहबाह्य संबंधातून दुहेरी हत्याकांड! पत्नीसह प्रियकराची हत्या, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

Pune Double Murder: तळवडे परिसरात दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मंगला सुरज टेंभरे या मृत महिलेचा याआधीही विवाह झालेला होता. दोन मुलं देखील आहेत. 

Crime News: विवाहबाह्य संबंधातून दुहेरी हत्याकांड! पत्नीसह प्रियकराची हत्या, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड: विवाहबाह्य संबंधातून पतीने बायको आणि तिच्या प्रियकराची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे भागात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरु आहे.

ड्रग्स प्रकरणातील 'बबनभाईला' VIP वागणूक! पोलीस ठाण्यात जेवणाची खास व्यवस्था

समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरातील तळवडे परिसरात विवाहबाह्य संबंधातून पत्नी आणि पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी आरोपी दत्तात्रय साबळेला बेड्या ठोकल्या आहेत. दत्तात्रय साबळे हा ठेकेदार आहे. मंगला सुरज टेंभरे ( वय 30 ) आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (वय 55) अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. याच विवाहबाह्य संबंधाची खात्री झाल्यानंतर आरोपी दत्तात्रय साबळे यांनी दोघांची हत्या केली आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे. तळवडे परिसरात दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मंगला सुरज टेंभरे या मृत महिलेचा याआधीही विवाह झालेला होता. दोन मुलं देखील आहेत. 

'मी बापाचं ऐकत नाही, पण मित्रांचं ऐकतो, त्यांच्याशी शरीरसंबंध ठेव'; पत्र्याच्या शेडमध्ये तिघांकडून मुलीचं लैंगिक शोषण

परंतु, पतीच्या मृत्यू पश्चात दत्तात्रय साबळे यांच्याशी विवाह केला होता. तरीही मंगला सूरज टेंभरे हिचे जगन्नाथ पुंडलिक सरोदे याच्याशी विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. या अनैतिक संबंधाची कानकुन पती दत्तात्रयला लागली होती. अखेर दत्तात्रय साबळे याने त्यांना पुराव्यासह पकडल्यानंतर त्यांची दगडाने ठेचून हत्या केली आहे. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com