Mumbai Actress Viral Video : ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील जीवन अनेकदा एकटेपणा आणि संघर्षांनी भरलेले असते,पण कधी कधी अनोळखी लोकांसोबतच कुटुंबाची नाळ जोडली जाते. मुंबईत भाड्याच्या घरात शेकडो लोक राहतात. पण काही लोक घरमालक आणि भाडेकरू असा भेदभाव न करता चांगल्या प्रकारे नातेसंबंध जपतात. कंटेंट क्रिएटर आणि अभिनेत्री करीमा बैरीने मुंबईत भाड्याच्या घरात राहताना घरमालकाशी जुळलेल्या नात्याची कहाणीही एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून लाखो लोकांनी याला पसंती दर्शवली आहे.
अभिनेत्रीनं व्हिडीओ शेअर करत काय म्हटलंय?
"करीमा बैरीने व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की,ती जवळपास दहा वर्षांपासून तिच्या घरापासून दूर राहते.मुंबईसारख्या शहरात योग्य घर शोधणे सोपे नसते.भाडेकरूंना खाण्यापिण्याच्या सवयी,लग्न झालंय की नाही किंवा व्यवसाय काय आहे? यासारखे प्रश्न विचारले जातात.पण जेव्हा तिची भेट दीपक काकांशी झाली,तेव्हा सर्व अडचणी दूर झाल्या.त्यांनी कोणताही भेदभाव न करता घर दिले आणि पहिल्याच भेटीत आपुलकी दाखवली."
नक्की वाचा >> दाट धुक्यात कार चालवताय? एकदा 'हा' मोबाईल जुगाडचा व्हिडीओ बघा, डॅशबोर्ड पाहून अनेकांना बसलाय धक्का
"करीमा पुढे सांगते, दीपक काकांना ‘घरमालक' म्हणून ओळखणं अजिबात आवडत नव्हतं. ते नात्याला जास्त महत्त्व देतात. त्यांच्या मुलगी माझी मैत्रीण झाली. तिने मला एक चांगली शेजारी म्हणून ओळख दिली. ज्यांनी कठीण काळात मला साथ दिला. दीपक काकांकडून न विचारता पाठवलेली सिंधी करी, घरातील टेराझो फ्लोअर ज्याने मला कोलकात्यातील बालपणीच्या घराची आठवण करून दिली आणि प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घेणे,या सर्व गोष्टी नात्याला खास बनवत गेल्या.
इथे पाहा करीमा बैरीनेचा व्हिडीओ
"करीमाने असंही म्हटलंय की, त्या घरात त्यांनी वाढदिवस साजरे केले.भिंतींवर चित्रे काढली.एक मांजर दत्तक घेतली.नाती जुळली आणि तुटली,मैत्री अधिक घट्ट झाली.ऑडिशन दिले आणि एक व्यक्ती म्हणून स्वतःला वाढताना पाहिले.जरी मी आता त्या घरातून बाहेर पडलो असलो,तरी ते घर त्यांच्या आयुष्यात नेहमी खास राहील, कारण ते पहिले घर होते जिथे एकटी राहूनही त्यांनी कधी मला एकटे वाटू दिले नाही."मुंबईसारख्या वेगवान शहरात फार कमी लोकांना त्यांच्या घरमालकाची आठवण येत असेल, पण मी दीपक काकांना खरोखर खूप मिस करते. माझ्या दृष्टीने ते फक्त घरमालक नव्हते,तर काका आणि वडिलांसारखे होते, ज्यांनी या शहरात त्यांना पहिले खरे घर दिले."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world