Married Woman Viral Video : संसाराचा गाडा हाकताना कधी कधी असे काही वळण येतात, ज्यामुळे असं वाटतं की पायाखालची जमिनच सरकली आहे.आयुष्य इतक्या शांतपणे इतकं काही हिरावून घेतं की, माणूस रडूही शकत नाही.तो फक्त स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतो.पार्कमध्ये एका बाकावर बसलेली स्त्री,डोळ्यांत साठलेल्या वेदना,मनात मुलांची चिंता आणि ओठांवर एकच वाक्य..‘आयुष्य कधी कोणत्या वळणावर उभं करेल,काहीच सांगता येत नाही.'
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होत असलेल्या महिलेचा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले असतील, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा व्हिडीओ आशा निराशेच्या शांततेनं सुरु होतो. पण व्हिडीओचा शेवट हा आशा पल्लवीत करणारा आहे. व्हिडीओत माणुसकीचं जिवंत उदाहरण तसंच प्रेमाच्या अतुट भावनाही व्यक्त केल्याचं दिसत आहे. व्यक्ती अनोळखी असली, तरी व्हिडीओ पाहून कोणीतरी आपलच आहे, याची जाणीव होते.
पतीचं हार्ट अटॅकने निधन झालं, नंतर तिने असं काही केलं..
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला पार्कमध्ये बसलेली दिसते.तिच्या पतीचं हार्ट अटॅकने निधन झालं, असं ती या व्हिडीओत सांगते. दु:खाच्या सावटात ती म्हणते की, तिने पतीला हेल्थ टेस्ट करण्यासाठी अनेकदा सांगितलं होतं.विशेषत:कोविड लसीकरण सुरु असताना तिने टेस्टबाबत सांगितलं होतं.पण पतीने याकडे दुर्लक्ष केल्याचं महिला सांगते. महिलेनं म्हटलंय की,तिला तीन मुलं आहेत. एक 16 वर्षांची मुलगी, दुसरी 14 वर्षांची आणि तिसरं 7 वर्षांचं मुलं आहे.
नक्की वाचा >> "विकला जाणारा मी महाराष्ट्र सैनिक नाही, माझी पत्नी..",राज ठाकरेंच्या सभेआधीच ठाण्यात खळबळ! Video
"कितीही दु:ख असो,फक्त मुलांचं संगोपन नीट झालं पाहिजे"
Some people say that women are women's worst enemies, but this video tells a completely different story.
— Samyukta Jain (@Drpooookie) January 11, 2026
Women like Awkward Goat and Rebel Kid don't even come close to the dust at the feet of these two women. pic.twitter.com/ZAdzDb5abL
महिला सांगते की,तिच्यावर दु:खाचं ओझंही आहे. पण ती संयमही ठेवते.आयु्ष्याच्या कठीण वळणावर आशेचा किरणही आहे. व्हिडिओत दिसणारी दुसरी मुलगी त्या महिलेला विचारते की,तिला स्वयंपाक करण्याची आवड आहे का?,यावर ती महिला हो असं उत्तर देते.त्यानंतर जे घडतं, ते पाहून अनेकांना हा क्षण अविस्मरणीय असल्यासारखं वाटतं.
नक्की वाचा >>Navi Mumbai: शिंदे विरुद्ध नाईक वाद पेटला! भाजपा उमेदवारांनी शिवसेना कार्यकर्त्याला चोपलं, Video व्हायरल
ती मुलगी महिलेसोबत बाजारात जाते.भांडी विकत घेते.तिला एक फेरीवाला (ठेला)मिळवून देते. "संजय रसोई", तिच्या पतीच्या स्मरणार्थ, असं नाव त्यावर लिहून देतात. हा फक्त एक ठेला नाही,तर आत्मसन्मानाची आणि आत्मनिर्भरतेकडे जाणारी पहिली पायरी आहे.1 मिनिट 15 सेकंदांच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world