जाहिरात

Actress Jumps from Train: अभिनेत्री करिश्मा धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याने गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

करिश्मा शर्माच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत, ज्यामुळे तिचे डोके सुजले आहे. डॉक्टरांनी तिच्या डोक्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे हे तपासण्यासाठी एमआरआय (MRI) करण्याचा सल्ला दिला आहे.

Actress Jumps from Train: अभिनेत्री करिश्मा धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याने गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Actress Jumps from Train: अभिनेत्री करिश्मा शर्माने धावत्या रेल्वेतून उडी घेतल्याने गंभीर जखमी झाली आहे. करिश्मा मुंबईत शूटसाठी जात असताना, धावत्या लोकल ट्रेनमधून उडी मारल्याने तिला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' आणि 'प्यार का पंचनामा' यांसारख्या चित्रपटांतून ओळख मिळवलेली करिश्मा शर्माच्या चाहत्यांसाठी ही एक चिंताजनक बातमी आहे.

घटना घडल्यानंतर करिश्मा शर्माने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबद्दल माहिती दिली आहे. तिने सांगितले की, ती एका शूटसाठी चर्चगेटला जात होती आणि शूटसाठी उशीर होत असल्यामुळे तिने लोकल ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला. तिच्यासोबत तिचे काही मित्रही होते. ट्रेनमध्ये चढत असतानाच अचानक ट्रेनचा वेग वाढला आणि तिचे मित्र ट्रेनमध्ये चढू शकले नाहीत. हे पाहून तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली.

उडी मारल्यामुळे ती पाठीच्या बाजूने खाली पडली आणि तिच्या डोक्याला मार लागलाआहे. या घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांनी तिच्या डोक्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे हे तपासण्यासाठी एमआरआय (MRI) करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

Latest and Breaking News on NDTV

करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “काल मी चर्चगेटला एका शूटसाठी जात होते. मी साडी नेसली होती. ट्रेनमध्ये चढताच ट्रेनचा वेग वाढला आणि माझे मित्र मागे राहिले. त्यानंतर घाबरून मी देखील उडी मारली आणि पाठीवर पडले. त्यामुळे माझ्या डोक्याला दुखापत झाली आहे. माझ्या पाठीला आणि शरीरावरही खूप जखमा आहेत. डॉक्टर म्हणतात की त्यांनी एमआरआय करायला सांगितला आहे. मला वेदना होत आहेत, पण मी स्वतःला सावरत आहे.”

करिश्मा शर्माने तिच्या चाहत्यांना लोकल ट्रेनमधून उडी मारण्याचा किंवा अशा परिस्थितीत कोणताही धोका पत्करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन केले आहे. या घटनेमुळे मुंबईतील लोकल प्रवासातील धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com