नवरात्रौत्सवात मंडळांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा, अदाणी इलेक्ट्रिसिटीचा निर्णय 

कंपनीची नवरात्रोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या तात्पुरत्या वीज जोडणीची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अदाणी समूहाचा भाग असलेल्या अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि.ने दुर्गापूजेच्या निमित्ताने नवरात्र उत्सव मंडळांना पूजा मंडपांसाठी सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. कंपनीची नवरात्रौत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या तात्पुरत्या वीज जोडणीची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे.  उत्सव मंडळे आणि दुर्गा पूजा समित्यांना अर्ज केल्यानंतर 48 तासांच्या आत तात्पुरती वीज जोडणी देण्यात येईल.  

परवडणाऱ्या दरात वीज 
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवरात्रोत्सव मंडळांना परवडणाऱ्या दरात वीज दिली जाणार आहे. दरवर्षी अदाणी इलेक्ट्रिसिटी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी, मंडळांना परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध करून देत असते. यंदाही अदाणी इलेक्ट्रिसिटीने ही परंपरा चालू ठेवली आहे.

नवरात्रौत्सवात मंडळाना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून पुढाकार घेण्यात आला आहे. नवरात्रौत्सवात आयोजकांना तात्पुरती वीज जोडणी दिली जाणार आहे.  त्यासाठी मंडळांनी अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या https://www.adanielectricity.com या संकेतस्थळावरील न्यू कनेक्शन विभागात तात्पुरती वीज जोडणी यावर क्लिक करा, अशी माहिती देण्यात आली आहे. 

Advertisement

 अदाणी समूहाचा मोठा सन्मान, TIME नं तयार केलेल्या जगातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत समावेश

अदाणी इलेक्ट्रिसिटीचे प्रवक्त्यांनी माहिती देताना सांगितले की सणासुदीचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना आम्हीही हातभार लावला आहे.  गेल्या वर्षी,  मुंबईतील 643 हून अधिक नवरात्रोत्सव मंडळांना अखंड वीजपुरवठा करण्यात आला होता. नवरात्रोत्सन आणि दुर्गा पूजा मंडळांना तातडीने वीजजोडणी देण्यासाठीची तयारी आम्ही पूर्ण केली आहे. 

वीज जोडणीचे काम करतेवेळी मंडळांनी योग्य ती खरबदारी घेण्याची आवाहन अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या वतीने करण्यात आले आहे. मंडळांमध्ये किंवा दुर्गा पूजेच्या मंडपांमध्ये भक्तांची गर्दी होते. त्यांच्या सुरक्षेसाठी परवानाप्राप्त कंत्राटदारांकडूनच जोडणीचे काम करून घेतले जावे असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तांच्या सुरक्षेसाठी RCCB म्हणजेच सर्कीट ब्रेकरचाही वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Advertisement

पूजा मंडप आणि उत्सवाच्या मैदानात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने सर्व पूजा समित्यांना अधिकृत परवानाधारक वीज कंत्राटदारांकडूनच वायरिंग करून घेण्याचे आवाहन केले आहे. पंडालला भेट देणारे भाविक आणि स्वयंसेवक यांच्या सुरक्षेसाठी आरसीसीबी (सर्किट ब्रेकर) वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

मंडपात येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षिततेसाठी नवरात्री-दुर्गापूजा मंडळांनी अधिकृत परवानाधारक वीज कंत्राटदारांकडूनच आपल्या मंडपाचे वायरिंग करून घ्यावे. तसेच मंडळांनी अनिवार्य असलेले रेसिडेन्शियल करंट सर्किट ब्रेकर (आरसीसीबी) मंडपात लावून घ्यावे. त्यायोगे भाविकांची आणि कार्यकर्त्यांची सुरक्षा राखली जाईल, असेही आवाहन अदाणी इलेक्ट्रिसिटीने केले आहे.

नक्की वाचा - 'अमित शहा नाही तर हे अहमद शाह अब्दाली', ठाकरे थेट भिडले

नवरात्री दुर्गापूजा मंडपात हे करा...
- मंडपात वायरिंग सुसज्ज असावे, मीटर केबिन मध्ये फक्त अधिकृत व्यक्तींना प्रवेश द्यावा.
- वीज जोडण्यासाठी मान्यताप्रत वायर आणि स्विच वापरावेत.
- आपातकालात वीजपुरवठा खंडित करण्यासाठी एक पॉईंट असावा.
- वायरिंगना लावण्यासाठीच्या टेप ह्यादेखील मान्यताप्राप्त चिकटपट्ट्या असाव्यात.
- मीटर केबिन आणि कनेक्शनच्या परिसरात जाण्यासाठी व्यवस्थित वाट ठेवावी.
- मंजूर केलेल्या वीज क्षमतेएवढाच वीजभार मंडपात वापरण्यात यावा.
- सुयोग्य क्षमतेच्या वायर तसेच मंजूर क्षमतेनुसार आरसीसीबी चा वापर करावा.
- बॅकअपसाठी जनरेटर असल्यास जनरेटरचा पृष्ठभाग तसेच न्यूट्रल यांचे व्यवस्थित अर्थिंग व्हावे.
- एक्सटेंशन साठी थ्री पिन प्लग वापरावा.
- आग विझवणारे अग्निशामन उपकरण मीटर केबिन जवळ ठेवावे आणि ते वापरण्याची माहितीही कार्यकर्त्यांना द्यावी.
- मीटर केबिन जवळ धोक्याचे चित्र-चिन्ह दाखवणारा फलक लावावा.
- मीटर केबिनला व्यवस्थित अर्थिंग असावे.

Advertisement

हे करू नका
- अवैध एक्सटेंशन घेऊ नये तसेच अवैध थेट वीजपुरवठा घेऊ नये.
- वायरिंगना चुकीच्या पद्धतीने जोड देणे टाळावे.
- मीटर केबिनच्या प्रवेशद्वारात कोणतेही अडथळे नसावेत.
- मंजूर वीज भारापेक्षा जास्त वीजभार वापरू नये.
- मोठे दिवे, फ्लड लाईट, मोठे पंखे तसेच वायरिंगच्या जोडण्या यांना कोणाचाही स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
- मीटर केबिनमध्ये आणि मीटर केबिनच्या जवळ अवैध धोकादायक वस्तू ठेवू नयेत.