अदाणी समूहाने TIME च्या प्रतिष्ठित जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या 2024 मधील यादीत स्थान मिळवलं आहे. 'स्टॅटिस्टा' या आघाडीच्या जागतिक उद्योग रँकिंग आणि सांख्यिकी पोर्टलच्या सहकार्यानं ही यादी तयार करण्यात आली आहे.
अदाणी समूहाने याबाबतच्या एका निवेदनात म्हटले आहे की, "अदाणी समूहाच्या कर्मचाऱ्यांचे समाधान, महसुलात वाढ आणि टिकावूपणा याविषयीच्या वचनबद्धतेला हा पुरस्कार अधोरेखित करतो. हे समूहाच्या कठोर परिश्रमाचे आणि व्यवसायांमध्ये सर्वोत्कृष्टता आणण्यासाठीच्या सीमारेषा पुढे ढकलण्याच्या आणि सततच्या प्रयत्नांचे आणखी प्रमाणीकरण आहे."
जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांची 2024 सालामधील यादी कर्मचाऱ्यांचे समाधान, महसूल वाढ आणि टिकाऊपणा या तीन आयामांच्या विश्लेषणावर आधारित आहे.
अदाणी समूहाच्या 11 पैकी आठ सूचीबद्ध कंपन्यांचा मूल्यांकनात विचार करण्यात आला. इतर तीन सूचीबद्ध कंपन्या या आठ कंपन्यांच्या उपकंपन्या आहेत, असे समूहाने एका निवेदनात म्हटले आहे.
मुल्यांकणासाठी विचार करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये अदाणी एंटरप्रायझेस, अदाणी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदाणी ग्रीन एनर्जी, अदाणी एनर्जी सोल्युशन्स, अदाणी टोटल गॅस, अंबुजा सिमेंट्स, अदाणी पॉवर आणि अदाणी विल्मार लिमिटेड यांचा समावेश आहे.
हे सर्वेक्षण 50 हून अधिक देशांमध्ये करण्यात आले. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शिफारसी, कामाची परिस्थिती, पगार, समानता आणि एकूण कंपनीची प्रतिमा यावर आधारित सुमारे 170,000 सहभागींनी कंपन्यांचे मुल्यांकन केले. 2023 साली 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त महसूल असलेल्या आणि 2021 ते 2023 दरम्यान वाढ दर्शविलेल्या कंपन्यांये या आधारावर हे मुल्यांकन झाले.
'स्टॅटिस्टा'च्या ESG डेटाबेस आणि लक्ष्यित संशोधनाच्या प्रमाणित ESG KPIs वर आधारित कंपन्यांवर लक्ष केंद्रित केलेल्या टिकाऊपणाचे परिमाण मूल्यांकन करण्यात आले.
( नक्की वाचा : Gautam Adani Success Story : 16 व्या वर्षी पहिल्यांदा सीमा ओलांडली, गौतम अदाणींनी सांगितलं यशाचं रहस्य )
जास्तीत जास्त 100 गुणांचा अंतिम रँकिंग स्कोअर तयार करण्यासाठी तिन्ही आयामांचे गुण समान टक्केवारीच्या आधारावर जोडले गेले. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 1,000 कंपन्यांना TIME आणि Statista द्वारे जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांचा 2024 पुरस्कार देण्यात आला आहे.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world