'वरळीत राजकीय चिखल, पण कमळ फुलणार नाही' आदित्य ठाकरेंचे सुचक वक्तव्य

आदित्य ठाकरे यांनी ही हे आव्हान स्विकारले आहे. वरळीत राजकीय चिखल झालाय. पण कमळ काही फुलणार नाही असे सुचक वक्तव्य करत त्यांनी विजय आपलाच होणार असे संकेत दिले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वेध लागले आहे. पुढीत दोन तीन महिन्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या आधीच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. आदित्य ठाकरे यांना त्यांच्या वरळी विधानसभेत त्यांना अडकवून ठेवण्याची रणनिती भाजप आणि मित्र पक्षांनी आखली आहे. मनसेनेही इथे कंबर कसली आहे. आदित्य ठाकरे यांचा पराभव करायचा यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि मनसेहे एकवटेल आहे. त्या दृष्टीने बैठकाही सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही हे आव्हान स्विकारले आहे. वरळीत राजकीय चिखल झालाय. पण कमळ काही फुलणार नाही असे सुचक वक्तव्य करत त्यांनी विजय आपलाच होणार असे संकेत दिले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

वरळीत आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमांना सध्या आदित्य ठाकरे हजेरी लावत आहेत. वरळीतल्या फुटबॉलच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी फुटबॉलचा धागा पकडत चिखलात फुटबॉल खेळायला मजा येते. वरळीतही राजकीय चिखल झाला आहे. पण कितीही चिखल झाल तरी इतं कमळ काही येणार नाही असे म्हणत वरळीत आमदार शिवसेनेचाच असणार हे त्यांनी सांगून टाकले.   

ट्रेंडिंग बातमी - निवृत्त बँक मॅनेजरला गंडवलं, तब्बल साडेनऊ लाखांचा लावला चुना

आदित्या ठाकरे यांच्या विरोधात मनसेने उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. संदिप देशपांडे यांना तसे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी मतदार संघात गाठीभेटी घेण्यास सुरूवातही केली आहे. ते महायुतीचे उमेदवार असतील की नाही हे अजून निश्चित नाही. मात्र लोकसभेला या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला फक्त सहा हजाराचे लिड मिळाले होते. त्यामुळे विरोधकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आदित्य ठाकरेंना कोंडीत पकडण्याची रणनिती त्यामुळेच आखली जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांच्या रामदास कदमांना शुभेच्छा, अलगद चिमटे काढले,नक्की काय घडलं?

वरळीत कोणीही यावे त्यांचे स्वागतच आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी जे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यांना शुभेच्छा दिल्या. आपणही निवडणुकीसाठी सज्ज आहोत असेही त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे मागिल निवडणुकीत वरळी विधानसभेतून जवळपास साठ हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले होते. मात्र आता झालेल्या लोकसभेत वरळीतले मताधिक्य हे कमालीचे घटले आहे. त्यामुळे ही निवडणूक आदित्य यांच्यासाठी आव्हानाची असणार आहे.  

Advertisement