ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेकांना लाखो रूपयाला गंडा घातला जातो.याच्या बातम्या आपण नेहमीच पाहातो आणि वाचतोही. पण त्यातून कोणतही काही शिक नाही. त्यामुळे पुन्हा अशा घटना घडत आहेत. रत्नागिरीमध्येही अशीच एक घटना घडली आहे. यात एका निवृत्त बँक मॅनेजरलाच तब्बल साडे नऊ लाखाला चुना लावण्यात आला आहे. यामागची चोरांची रणनिती थक्क करणारी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अविनाश श्रीराम वैद्य हे रत्नागिरीत राहातात. ते बॅकेत मॅनेजरम्हणून कामाला होते. त्यानंतर ते निवृत्त झाले. एक दिवस त्यांना सावित्री शर्मा बीएलके इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ओमकार रमेशचंद्र भुतडा, होस्ट सानिया या तिघांनी मिळून मोबाईलवरून संपर्क साधला. शेअर मार्केटच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत विश्लेषण केले. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं अमिष त्यांना दाखवले. 5 फ्रेब्रुवारी ते 16 मे पर्यंत हे लोक वैद्य यांच्या संपर्कात होते. ही सर्व चर्चा ऑनलाईन सुरू होती.
ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांच्या रामदास कदमांना शुभेच्छा, अलगद चिमटे काढले,नक्की काय घडलं?
या तिघांनी दिलेल्या अमिशाला वैद्य बळी पडले. शेअर मार्केटमध्ये गुतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असा विश्वास त्यांना वाटला. त्यांनी मग या तिघांच्या खात्यात 9 लाख 50 हजार रुपये वर्ग केले. त्यानंतर ज्या कंपनीच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. वैद्य यांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण ज्या क्रमांकावरून त्यांना फोन आला होता तो बंद होता. वारंवार फोन करून ही काही संपर्क होत नव्हता. शेवटी आपण गंडवलो गेलो आहोत याची कल्पना वैद्य यांना आली.
ट्रेंडिंग बातमी - महायुतीत ठिणगी? रामदास कदम भडकले, भाजपला झाप-झाप झापले
अविनाश श्रीराम वैद्य यांनी तातडीने रत्नागिरी पोलिस स्टेशन गाठले. त्यांच्या बरोबर झालेली हकीगत त्यांनी पोलिसांना सांगितली. एक बँक मेनजरही अशा आर्थिक व्यवहारांना गंडू शकतो हे ऐकून पोलिसही चकीत झाले. पोलिसांनीही वैद्य यांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय तपासही सुरू केला आहे. मात्र अजून कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र वैद्य यांनी अंधळेपणाने विश्वास ठेवत आपली पुंजी त्यांच्या हवाली केली. आता त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world