Crime News : हात-पाय मोडले, अंगावर चटके दिले; दत्तक घेतलेल्या चिमुकलीची छळ करुन हत्या

Crime News : आयत फईम शेख असे मयत चिमुकलीचे नाव आहे. तर शेख फईम आणि फौजिया अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सहाच महिन्यांपूर्वी शेख फईम आणि फौजिया यांनी बाँडपेपर करत आयातला 5 हजार रुपयांमध्ये विकत घेतले होते.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar Crime News : दत्तक घेतलेल्या अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीची दाम्पत्याने छळ करुन, हालहाल करुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हात-पाय मोडून, अंगावर चटके देत चिमुकलीची निर्घृण हत्या करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड शहरातील मुगलपुरा भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी निर्दयी पती-पत्नीला अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आयत फईम शेख असे मयत चिमुकलीचे नाव आहे. तर शेख फईम आणि फौजिया अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सहाच महिन्यांपूर्वी शेख फईम आणि फौजिया यांनी बाँडपेपर करत आयतला 5 हजार रुपयांमध्ये विकत घेतले होते.  

दारुड्या बापाने भिक मागायला लावली

आयतचे आई-वडील नाजिया शेख आणि शेख नसीम अब्दुल कायुम यांचे 15 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यातून या दाम्पत्याला पाच मुली झाल्या. नाजियाला पती शेख नसीम नांदवत नसल्याने नाजिया व शेख नसीम यांचा जून 2024 मध्ये घटस्फोट झाला होता. त्यांच्या चार मुली या नाजियाकडे, तर चार वर्षीय आयत ही वडील शेख नसीमकडे राहत होती. मात्र नसीम हा दारूडा होता, तो मुलगी आयतला भीक देखील मागायला लावत असे. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: गर्लफ्रेंडवर 6 वेळा अत्याचार, वॉशिंग मशीनमुळे बॉयफ्रेंड गजाआड, नेमकं काय घडलं?

दरम्यान काही दिवसांपूर्वी शेख नसीमने आयातला पाच हजार रुपयांमध्ये शेख फईम नावाच्या व्यक्तीला विकले होते. यावेळी दोघांनी 100 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर आयातला दत्तक देत असल्याचा करार केला. तेव्हापासून आयात ही आरोपी फौजिया व शेख फईमसोबत राहत होती. मात्र या दोघांमध्ये विकत घेतलेल्या आयातवरून सतत वाद होऊ लागले आणि याच वादातून त्यांनी तिची हत्या केली.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Shocking news : प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल, 14 मिनिटांच्या 'त्या' व्हिडीओत काय?

छळ करुन आयतची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फौजिया आणि शेख फईमने आयातला अनेक दिवस जेवणही दिलं नव्हता. छोट्या छोट्या कारणांवरून दोघेही तिला बेदम मारहाण करत असे. दोघांनी आयतचे अक्षरश: हात-पाय मोडून, अंगावर चटके देख छळ करुन हत्या केली. चिमुकल्या जीवाने या यातना कशा सोसल्या असतील याची कल्पना करुनही मन सुन्न होतं. या प्रकरणी पोलिसांना दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 

Topics mentioned in this article