Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!

Chhatrapati Sambhajinagar: अशोक बांदल काही दिवसांपासून लग्नासाठी मुलीचा शोध करत होते. याच काळात अशोक यांची अरविंद राठोड नावाच्या व्यक्तीसोबत भेट झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Crime News: छत्रपती संभाजीनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न जुळवण्यासाठी 3 लाख रुपये घेऊन कोर्टात नोटरीद्वारे लग्न केल्यानंतर सासरी निघालेल्या नवरीने अर्ध्या रस्त्यातून धूम ठोकली. वाळूज परिसरातील बजाजनगर येथे हा प्रकार उघडकीस आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील 29 वर्षीय शेतकरी अशोक बांदल यांची या प्रकारात फसवणूक करण्यात आली असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक बांदल काही दिवसांपासून लग्नासाठी मुलीचा शोध करत होते. याच काळात अशोक यांची अरविंद राठोड नावाच्या व्यक्तीसोबत भेट झाली. दरम्यान एकदा अशोकने लग्नाची इच्छा व्यक्त केल्यावर अरविंदने त्यांच्या गावाकडे चांगल्या मुलींची स्थळे असल्याचे सांगितले. त्याने व्हॉट्सअॅपवर दोन ते तीन मुलींचे फोटोही अशोकला पाठवले. त्यापैकी माया शिंदे नावाची मुलगी अशोक बांदलने पसंत केली होती.

तर मायाच्या वडिलांचे निधन झाले असून, ती आई आणि भावासोबत राहत असल्याचे अरविंदने सांगितले. लग्न जुळवून देताना अरविंदने एक अट घातली. लग्न करण्यासाठी 3 लाख रुपये स्त्रीधन द्यावे लागेल, असे अशोकला सांगितले. अशोकने अट मान्य केल्याने लग्न करण्याचे ठरले. पण एकदा मुलाच्या नातेवाईकांना बोलावून मुलगी बघण्याचा कार्यक्रम उरकून घेण्याचे ठरले. त्यानुसार 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता अशोक बांदल, त्याचा चुलतभाऊ आणि इतर नातेवाईक बजाजनगरातील अयोध्यानगरात सविता शिंदे यांच्या घरी गेले. तेथे मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला.

(नक्की वाचा-  Cute VIDEO: मुलीने दाखवली 'कोरियन हार्ट' साईन; वडिलांच्या रिअ‍ॅक्शनने जग जिंकलं, व्हिडीओ व्हायरल)

अन् नवरी फुर्रर्रर्रर्रर्र....

मुला-मुलीची पसंती झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील कोर्टात वकील शैला लालसरे यांच्या उपस्थितीत 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर नवरदेव-नवरी स्वखुशीने विवाह करत असल्याची नोटरी केली. त्यानंतर ते सर्वजण पुन्हा सविता शिंदे यांच्या घरी परतले. ठरल्यानुसार अशोक बांदलने 1 लाख 45 हजार रुपये फोन पे द्वारे आणि 1 लाख 55 हजार रुपये रोख असे 3 लाख रुपये दिले.

Advertisement

(नक्की वाचा-  Shocking! प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी छळ, IAS अधिकाऱ्याच्या मुलीने संपवलं जीवन)

पुढे पैसे मिळाल्यानंतर मुलीची आई सविता शिंदे यांनी मायाला आजच सोबत घ्या, उद्या गावाकडे लग्न लावून घेऊ" असे सांगितले. त्यानुसार मायाला कारमध्ये बसवून सर्वच निघाले. पण काही अंतरावर गेल्यानंतर पाठीमागून विना क्रमांकाची पांढरी कार ओव्हरटेक करून समोर आडवी लावली. त्या कारमधून चौघेजण उतरले. बांदलच्या कारमधून माया उतरली आणि त्या कारमध्ये बसली. काही क्षणात कार गायब आणि नवरीही फुर्रर्र झाली आहे.

आपली फसवणूक झाल्याचे बांदल यांच्याल लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अधिक तपास सुरु आहे.

Advertisement