Mumbai Railway News : मुंबईत मेट्रोनंतर रेल्वे देखील जमिनीखालून धावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मध्य रेल्वेवर परळ-करी रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन बांधण्यासाठी भूमिगत बोगद्याची निर्मिती करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत. मुंबई मेट्रो जमिनीखालून धावू शकते तर रेल्वे का नाही? असा विचार रेल्वेचा आहे. सर्व नियोजन येग्यरित्या झालं तर मुंबईला पहिली भूमिगत रेल्वे लाईन मिळू शकेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्य रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या रेल्वे कॉरिडॉरचा पहिला टप्पाचे कुर्ला ते परेल सध्या काम सुरू आहे. त्यानतंर दुसऱ्या टप्प्य्यात परेल ते सीएसएमटी अशा 7.4 किमी मार्गाचा समावेश आहे. मात्र या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पात भूसंपादन आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन असं मोठं आव्हान रेल्वेसमोर आहे. ही आव्हाने पाहता रेल्वे जमिनीखालून बोगदा खोदून प्रश्न सुटेल का? याचा विचार रेल्वेकडून केला जात आहे.
जमिनीखालून मार्ग गेल्यास सर्व समस्या सुटतील आणि प्रवासही सोपा होईल. मुंबई मेट्रो ते करू शकते, तर रेल्वे का नाही, असा रेल्वेचा युक्तिवाद आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Ajit pawar vs Shivsena: "दादा'गिरीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता! शिंदे सेनेत उद्रेक होणार?)
रेल्वेची हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी तो अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन आणि मध्य रेल्वे यांनी काही वेळा बैठका घेतल्या आहेत. प्रस्तावित भुयारी रेल्वे मार्गासाठी अद्याप आराखडा देखील तयार केलेला नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं की, दुसऱ्या टप्प्यातील ही रेल्वे लाईन 7.4 किमी लांबीची असेल. भुयारी रेल्वेच्या शक्यतेचा आम्ही अजूनही अभ्यास करत आहोत.
सीएसएमटी आणि परळ येथे बोगद्याची बोरिंग मशीन्सच्या प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी जमिन उपलब्ध आहे का हे देखील तपासावं लागेल. सीएसएमटीच्या टोकावरील प्रस्तावित बोगद्यासाठी दोन प्रवेशांचा विचार केला जात आहे. त्यातील एक टर्मिनसच्या आत आणि दुसरा टर्मिनसजवळ असेल. मध्य रेल्वेला मेट्रो 3 च्या भूमिगत सीएसएमटी स्टेशनचा देखील विचार करावा लागेल.
(नक्की वाचा- Pahalgam attack: पाकिस्तानची टरकली! 'फतह' या क्षेपणास्त्राची केली चाचणी, 3 दिवसात 2 चाचण्या)
खर्च किती येणार?
भुयारील रेल्वे कॉरिडॉरला मंजुरी मिळाली तर संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च 3000 कोटी रुपये इतका असेल. फक्त ओव्हरलँड लाईन्ससह 2008 मध्ये अंदाजे खर्च 890.89 कोटी होता. त्यानंतर तो सुधारित करून 1337 कोटी करण्यात आला आहे.