Mumbai News : सध्या महाराष्ट्रभरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तर रात्रीचं घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. अशातच मुंबईत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असा सल्ला दिला जात आहे.
मुंबईतही बिबट्याची दहशत...
मुंबईतील गोरेगाव पूर्व भागात बिबट्याशी दहशत पसरली आहे. गोरेगाव पूर्वेकडील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्याचा मुक्त संचार दिसत आहे. बिबट्या रात्री रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. बिबट्याचे मुंबईत संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहिलं आहे. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री अपरात्री बिबटयाचा वावर पाहायला मिळत आहे. हा बिबट्या कॅमेरात सुद्धा कैद झाला आहे.
नक्की वाचा - Pune News : पुण्यात भीतीचं वातावरण, रात्री फिरणं झालंय धोक्याचं; पहाटे 3 वाजताचा धक्कादायक Video आला समोर
बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. यादी या भागात संरक्षण जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. मात्र या जाळ्या ओलांडून बिबट्या सोसायटीमध्ये शिरत आहे. त्यामुळे संभाव्य बिबट्याचे हल्ले आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, असं पत्र आमदार सुनील प्रभू यांनी मंत्री गणेश नाईक यांना पाठवलं आहे.