3 minutes ago

Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बुधवारी सकाळी त्यांच्या विमानाला बारामतीत अपघात झाला. अजित पवार हे सकाळी 8.10 च्या सुमारास मुंबईहून निघाले होते आणि ते बारामतीमध्ये 8.50 ला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र बारामतीजवळ विमान येताच त्यांच्या विमानाला अपघात झाला ज्यात अजित पवारांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. 

Jan 28, 2026 13:25 (IST)

Ajit pawar Death Update: शरद पवार बारामतीत दाखल

Ajit pawar Death Update: शरद पवार बारामतीत दाखल 

Jan 28, 2026 13:20 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवार यांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवार यांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर

Jan 28, 2026 13:18 (IST)

Ajit Pawar Death Updates: अजित पवारांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज समोर

Jan 28, 2026 13:08 (IST)

Ajit Pawar Live Update: महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला- राज ठाकरे

राज ठाकरे


माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली. १९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील. प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे. अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की. राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे. मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.


Advertisement
Jan 28, 2026 12:56 (IST)

Ajit Pawar Death LIVE Update: महाराष्ट्राने उमदा नेता गमावला: राज ठाकरे

Jan 28, 2026 12:54 (IST)

Ajit Pawar Death LIVE Update: अजित पवारांचे अंत्यसंस्कार काटेवाडीत व्हावे.. ग्रामस्थांची मागणी

पवार कुटुंबाचे मूळ गाव असणाऱ्या काठेवाडी गावात शोक काळा पसरली. काटेवाडी गावचा बाप माणूस हरपला अशी भावना ग्रामस्थांची दिसून येते. ज्या काठेवाडीत अजितदादांचे बालपण गेले. त्याच काटेवाडी त्यांना शेवटचा निरोप द्यावा. त्यांचे अंत्यसंस्कार काटेवाडी च्या मातीतच व्हावे. अशी इच्छा काटेवाडी ग्रामस्थांची आहे.

Advertisement
Jan 28, 2026 12:53 (IST)

Ajit Pawar Death LIVE: 'माझा मोठा भाऊ गेला..' अजित पवार

अजित पवार यांचे जाणे अत्यंत दुःखद घटना आहे त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची अपरिमित हानी झालीय.अत्यंत सामाजिक जाण असणारा शिस्तबद्ध असं नेता.काम करताना सकाळी सात वाजता कामाला सुरुवात करणारा आणि शेतकरी कुटुंबाशी नाळ जोडणारा रोखठोक नेतृत्व अशीi त्यांची वेगळी ओळख होतो, माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात त्यांनी साथ दिली. 

एका मोठ्या भावाची भूमिका त्यांनी माझ्या बाबत राबवली. दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात म्हणून मी त्यांना सातत्याने बोलून प्रयन्त करत होतो. माझी आणि त्यांची शेवटची भेट कृषी प्रदर्शनाच्या दरम्यान झाली त्यांनी प्रत्येक स्टोल मध्ये घेऊन जाऊन त्यांनी मला प्रदर्शन दाखवलं जवळच घट्ट अस नात त्यांचं आणि माझं होत.राष्ट्रवादी कधीच भरून न निघणारे नुकसान दादाच्या जाण्याने झालाय. त्यांच्या जाण्याने तीव्र आणि दुखतं भावना आमच्या कुटूंबियांना झालाय.या दुःखद पवार कुटूंबियांना झालेले हे दुःख सावरण्याची शक्ती त्यांना देऊन अस दुःख माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. 

Jan 28, 2026 12:41 (IST)

Ajit Pawar Death Updates: अजितदादांचं जाणं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला धक्का देणारे: जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

अजितदादा यांच्या अकाली जाण्याने सबंध महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. एक निडर आणि साहसी व्यक्तिमत्व म्हणून मी अजित दादा यांचे वर्णन करीन. अजित पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या तालमीत तयार झालेले व्यक्तिमत्त्व! त्यामुळेच सत्ता ही लोकांसाठी आहे, याचे भान असलेले नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार !! 

आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे  बोट धरून ते राजकारणात आले, हे खरे, पण त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची ओळख तयार केली,  ती स्वतःच्या कर्तबगारीने!  अजितदादा यांचा प्रशासनावर दरारा असला तरी त्यांची दहशत नव्हती. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेकांना आदरयुक्त भिती वाटत होती. 

कोणतीही व्यक्ती ही काळाचे अपत्य असते. मात्र, अजित पवार हे काळाचे नेते होते. काळाच्या मर्यादा त्यांनाही होत्या. तरीही ते लोकनेते होते. मोजका आहार, उत्तम व्यायाम आणि भल्या पहाटे कामाला सुरूवात असे शिस्तबद्ध आयुष्य ते जगले. 

कार्यकर्त्यासाठी धावून जाणारे अजितदादा मला अधिक भावले होते. एका खोट्या गुन्ह्यात मला अडकवल्यानंतर विमनस्क अवस्थेत राजकारणातून संन्यास घेण्याच्या निर्णयाप्रत मी आलेलो असताना माझ्या समर्थनार्थ सर्वात आधी धावून येणारे अजितदादाच होते. 

त्यांचे असे अकाली जाणे मनाला प्रचंड वेदना देणारे तर आहेच; पण,  महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला धक्का देणारे आहे. 

दादा, भावपूर्ण आदरांजली!! 

Advertisement
Jan 28, 2026 12:15 (IST)

Ajit Pawar Death Update: आमच्या आयुष्यातील आज सर्वात वाईट दिवस- जयंत पाटील

जयंत पाटील, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे असेच म्हणावे लागेल. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे. अजितदादा आणि माझे गेल्या जवळपास ३५ ते ४० वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते प्रदीर्घकाळ आम्ही एकत्र काम केले. 

महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच अशा प्रकारे अजित दादांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान कधीही भरून निघणार नाही.   

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सर्वाधिक उत्तम प्रशासक व एक अत्यंत मोठा लोकनेता महाराष्ट्राने कायमचा गमावला आहे. अजित दादांची उणीव कायम भासत राहील.

Jan 28, 2026 11:57 (IST)

Ajit Pawar Death Update: अजितदादांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे- CM देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

"अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेले नेते होते. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारे आहे. माझ्यासाठी वैयक्तिक एक दमदार आण दिलदार मित्र सोडून गेला आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीला निघणार आहोत. पंतप्रधान,गृहमंत्री यांच्याी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या घटनेची कल्पना दिली आहे. त्यांनीही प्रचंड दुख व्यक्त केले आहे. संपूर्ण देशात या घटनेमुळ हळहळ पसरली आहे. पुढील गोष्टी परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील."

राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर- मुख्यमंत्री 

"संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केली आहे. तीन दिवसांचा दुखवटा देखील जाहीर केला आहे."

"अजितदादांचं जाणं हे कधीही भरून न निघाणारे नुकसान आहे. लोकनेते निघून गेल्यानंतर पोकळी निर्माण होते, ती भरून काढणे कठीण आहे. संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. या घटनेवर विश्वास ठेवण्यास मन तयार होत नाही", असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

Jan 28, 2026 11:54 (IST)

Ajit Pawar Death Update: केरळच्या विधानसभेने अजित पवारांच्या निधनाबद्दल मौन बाळगून वाहिली श्रद्धांजली

Ajit Pawar Death Update: केरळच्या विधानसभेने अजित पवारांच्या निधनाबद्दल मौन बाळगून वाहिली श्रद्धांजली

Jan 28, 2026 11:45 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? प्रत्यक्षदर्शींनी थरकाप उडवणारा प्रसंग

अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? प्रत्यक्षदर्शींनी थरकाप उडवणारा प्रसंग

 

Jan 28, 2026 11:09 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: मोठा भाऊ गेल्याची भावना, एकनाथ शिंदे यांची भावुक प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

"अजित पवारांच्या निधनाची बातमी वेदना आणि मनाला चटका लावणारी आहे. अजितदादा आपल्याला एवढ्या लवकर सोडून जातील असं कधीही वाटलं नव्हतं. परखड, स्पष्टवक्ते मात्र मनाने अतिशय निर्मळ अशा स्वभावाचे ते होते. मी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात होतो. मी मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री होते. लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा त्यांनी आर्थिक तरतूद उत्तमरित्या केली," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

"एकदा करायचं ठरवलं की ते करायचेच. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. आम्ही टीम म्हणून काम केले. अजितदादा पहाटे लवकर काम सुरु करायचे. सकाळी ६ वाजता देखील त्यांनी वेळ दिलेलं अनेकांनी पाहिलं आहे. काल-परवाच आमची भेट झाली होती. सकाळी ही घटना कळली तेव्हा काल-परवाच्या आठवणी समोर येऊ लागल्या. माझ्यापेक्षा राजकारणात आणि वयाने ते मोठे होते. राज्यातील अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास होता. राज्याला त्याचा फायदा होत होता", असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.  

"मंत्रिमंडळात एखादा विषय आला की त्याबद्दल निर्भिडपणे सांगणारे ते नेते होते. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबीयांचंच नाहीतर राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. आज मोठा भाऊ गेल्याची भावना आणि दु:ख मला वाटतंय. पवार कुटुंबीयांसाठी हे डोंगरावर दु:ख आहे. हे दु:ख पचवण्याची त्यांचा ईश्वर शक्ती देवो." 

Jan 28, 2026 10:54 (IST)

Ajit Pawar Death Live: अजितदादा कडक शिस्तीचे, मात्र मनाने प्रचंड हळवे होते- संजय शिरसाट

संजय शिरसाट, शिवसेना शिंदे गट

वेळेचे महत्त्व अजित पवारांनी ओळखले होते. कडक शिस्तीचे होते मात्र मनाने ते प्रचंड हळवे होते. त्यांनी संकटे आल्यानंतर एकट्याने तो केला. अनेकवेळा त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, मात्र दादांनी त्याची पर्वा केली नाही. 

Jan 28, 2026 10:51 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवार यांचे अकाली निधन कधीही भरून न येणारे नुकसान- राष्ट्रपती

द्रोपदी मुर्मू, राष्ट्रपती

महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे. अजित पवार यांचे अकाली निधन हे एक कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांना, समर्थकांना आणि चाहत्यांना मनापासून संवेदना व्यक्त करत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांनाही देव हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

Jan 28, 2026 10:44 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवार जनतेचे नेते होते- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नरेंद् मोदी, पंतप्रधान

अजित पवार जनतेचे नेते होते. तळागाळातील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात अग्रेसर होते. एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींची त्यांची समज आणि गरीब व वंचित लोकांना सक्षम करण्याची त्यांची तळमळही उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या संवेदना. 

Jan 28, 2026 10:40 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं : नितीन गडकरी

अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं : नितीन गडकरी

"अजित पवार माझे घनिष्ठ मित्र होते. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते. उत्तम प्रशासक आणि विकासाची दूरदृष्टी असलेले ते नेते होते.  त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. पवार कुटुंबियावर हा मोठा आघात आहे. माझ्या या सहकाऱ्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, नितीन गडकरी यांची भावनिक प्रतिक्रिया

Jan 28, 2026 10:35 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवारांचं माझ्यावर कायम प्रेम होतं- निलेश लंके

Ajit Pawar Death Update: महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भेटलो होतो, ती भेट शेवटची होती. आमदार असताना मी अजित पवारांच्या अत्यंत जवळचा होतो. त्यांचे प्रेम माझ्यावर कायम होतं- निलेश लंके, खासदार

Jan 28, 2026 10:33 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: विमान अपघातावेळी विमानात कोण कोण होते?

विमान अपघातावेळी विमानात एकूण पाच प्रवासी होती. सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमान मुंबईतून निघाले होते. बारामतीत ८ वाजून ५० मिनिटांना लँड होणार होते. 

 

अजित पवार 

मुंबई पीएसओ HC विदीप जाधव 

पायलट कॅप्टन सुमित कपूर 

कॅप्टन संभवी पाठक 

पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

Jan 28, 2026 10:22 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: "ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केल ते दादा आम्हाला सोडून गेले"- हसन मुश्रीफ

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवारांच्या मृत्यूच्या बातमी कळताच हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर

"ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केल ते दादाचं आम्हाला सोडून गेले", हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया

Jan 28, 2026 10:17 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: "डोकं खूप सुन्न झालं ऐकून", अंजली दमानिया यांचं भावुक ट्वीट

"डोकं खूप सुन्न झालं ऐकून", अंजली दमानिया यांचं भावुक ट्वीट

Jan 28, 2026 10:12 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: PM मोदी आणि अमित शाह यांचा CM फडणवीसांना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

घटनेची माहिती घेतली आहे. 

Jan 28, 2026 10:08 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचे सर्व दौरे आणि कार्यक्रम रद्द केले आहेत. एकनाथ शिंदे थोड्याच वेळात बारामतीसाठी रवाना होणार आहेत. 

Jan 28, 2026 10:06 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: मी आज खुप दु:खी आहे: अरविंद सावंत

मी आज खुप दु:खी आहे. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्षावर मोठा घाव आहे. बारामतीच्या प्रगतीमध्ये अजित पवारांचं मोठं योगदान होतं. पवार कुटुंबियांच्या दुखात मी सामील आहे, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची भावनिक प्रतिक्रिया 

Jan 28, 2026 10:03 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी अनेक नेते दाखल

दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी अनेक नेते दाखल झाले आहेत. आमदार रोहित पवार देखील बारामतीसाठी रवाना झाले. -आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. 

Jan 28, 2026 10:01 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची भावुक प्रतिक्रिया

नवी दिल्ली: मला अपघाताबद्दल काही माहिती नाही. टीव्हीवरील बातमी पाहून मी इथे आले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची प्रतिक्रिया

Jan 28, 2026 09:55 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवारांच्या विमानाचा अपघात घातपात असू शकतो- नितीन राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात घातपात असू शकतो. या अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी केली आहे. 

Jan 28, 2026 09:45 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवारांसह 3 जणांचा मृत्यू, PTI ची माहिती

 Ajit Pawar Plane Crash Live:  अजित पवार आणि 3 जण प्रवाशांचा मृत्यू, PTI ची माहिती

Jan 28, 2026 09:43 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवार यांच्या विमान अपघाताचे लाईव्ह अपडेट्स

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवार यांच्या विमान अपघाताचे लाईव्ह अपडेट्स

Jan 28, 2026 09:42 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार थोड्याच बारामतीकडे रवाना होणार

खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार थोड्याच बारामतीकडे रवाना होणार

अधिवेशन असल्याने खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार दिल्लीत आहेत

Jan 28, 2026 09:34 (IST)

Ajit Pawar Plane Crash Live: अजित पवारांच्या विमानाला लँडिंगदरम्यान आग

अजित पवारांच्या विमानाला लँडिंगदरम्यान आग लागली होती. विमाना अक्षरश: जळून खाक झालं आहे. 

Jan 28, 2026 09:30 (IST)

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले होतै

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार सकाळी ८ वाजत मुंबईतून बारामती विमान निघाले होते. विमानात अजित पवार आणि सुरक्षारक्षक होते

Jan 28, 2026 09:26 (IST)

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांसह ४ जण विमानातून प्रवास करत होते

अजित पवार आणि सुरक्षारक्षक असे 4 जण विमानातून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती

Jan 28, 2026 09:24 (IST)

Ajit Pawar plane Crash: अजित पवार यांच्या विमानाचा अपघात, अजित पवार गंभीर जखमी

Topics mentioned in this article