"अजित पवार आमच्यासोबत आहेत तर आम्हाला कुणाचीही गरज नाही", नवाब मलिकांचं वक्तव्य

मानखुर्द मतदारसंघातून आपण उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. अजित पवार आमच्यासोबत आहेत तर आम्हाला कुणाचीही गरज नाही.  

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अजित पवार हे महाराष्ट्रातील किंगमेकर असून ते कधीही पक्ष बदलू शकतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आम्हाला प्रचारासाठी भाजपच्या पाठिंब्याची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलं. मुलगी सना मलिक यांचा अणुशक्तीनगर येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते उपस्थित होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मानखुर्द मतदारसंघातून आपण उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. या रॅलीमध्ये महायुतीचे सर्व पक्षांचे झेंडे होते. मात्र भाजपचा झेंडा कुठेही दिसत नव्हता. यावर नवाब मलिक म्हणाले की, अजित पवार आमच्यासोबत आहेत तर आम्हाला कुणाचीही गरज नाही.  

भाजपसाठी आव्हान

नवाब मलिक यांचे विधान भाजपसाठी आव्हान मानले जात आहे. अजित पवार नवाब मलिक यांच्या किंगमेकरच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल. भाजपच्या विरोधानंतरही नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मात्र मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले होते की, "आम्ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित कोणालाही तिकीट देणार नाही."

(नक्की वाचा - बारामतीत काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढत; दोन्ही पवार आज भरणार उमेदवारी अर्ज  )

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मित्रपक्ष भाजपच्या आक्षेपानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने आमदार मलिक यांना आपल्या बाजूला घेतले होते. आता ते अपक्ष म्हणून मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यांना अजित पवारांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादीकडून फहाद अहमद रिंगणात

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. आता या जागेवरील लढत स्टारडम विरुद्ध राजकीय वारसा अशी झाली आहे.

(नक्की वाचा- Shivsena List : शिवसेना शिंदे गटाची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरेंसमोर 'या' खासदाराचं आव्हान)

सना मलिकांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, माझे वडील तुरुंगात असताना मी त्यांच्या अणुशक्तीनगरमध्ये खूप काम केले. फहाद अहमद अभिनेत्री स्वरा भास्करचे पती असल्याशिवाय त्यांची कोणतीही मोठी ओळख नाही. या जागेवर माझ्यासाठी कोणतेही आव्हान नाही.