बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरूद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनैत्रा पवार असा सामना रंगला होता. यात सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. विधानसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे.
बारामतीत आज पवार विरुद्ध पवार अशा लढाईला सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे देखील आपले आजोबा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कन्हेरी येथील श्री हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून ते या निवडणुकीचे रणशिंग फुंकतील अशी माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world