लोकसभेतील चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न? मुंबईतील जनसन्मान यात्रा अजित पवारांसाठी 3 कारणांमुळे महत्त्वाची

अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न मुंबईतील जनसन्मान यात्रेद्वारे करणार आहे. लोकसभा निवडणुकीतील डॅमेज कंट्रोल करण्याचा देखील प्रयत्न अजित पवारांचा असणार आहे. 

Advertisement
Read Time: 3 mins

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेनिमित्त राज्यभर दौरा करत आहेत. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम आज मुंबईतील अणुशक्ती नगर येथे पार पडत आहे. अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अनेक राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न मुंबईतील जनसन्मान यात्रेद्वारे करणार आहे. लोकसभा निवडणुकीतील डॅमेज कंट्रोल करण्याचा देखील प्रयत्न अजित पवारांचा असणार आहे. 

सना मलिकांची राजकारणात एन्ट्री

अजित पवार मुंबईत विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करत आहेत. नवाब मलिक कारागृहातून बाहेर आल्यापासून राजकारणात सक्रीय नाहीत. नवाब मलिक यांनी कोणत्या राष्ट्रवादी सोबत आहेत हे स्पष्ट केलेले नाही. नवाब मलिकासाठी हा निर्णय दोन्ही बाजूंनी अडचणीचा आहे. त्यामुळे तिसरा पर्याय समोर येताना दिसत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या राजकारणात उतरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांच्या जागी सना मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढू शकतात, अस बोललं जात आहे. 

नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी सना मलिक या अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे. महायुतीतील मित्र पक्ष शिवसेना आणि भाजपकडून नवाब मलिक यांना विरोध होऊ शकतो. मात्र सना मलिक अजित पवार गटासोबत असतील तर त्यांना थेट विरोध शिवसेना-भाजपला करता येणार नाही. त्यामुळे सना मलिक या विधानसभा निवडणूक सहज लढू शकतात. अशारीतीने अजित पवारांचा हा डाव यशस्वी होताना दिसत आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींची निराशा! सरकारने 3000 रुपये दिले, हातात 500-1000 रुपये आले)

झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीच्या वाटेवर

दुसरीकडे बाबा सिद्दिकी हे देखील जनसन्मान यात्रेनिमित्त शक्तिप्रदर्शन करणार आहेत. बाबा सिद्दिकी यात्रेदरम्यान बाईक रॅली काढणार आहे. काँग्रेस आमदार आणि बाबा सिद्दिक यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी या यात्रेदरम्यान दिसणार का? असा प्रश्न देखील अनेक पडला आहे. कारण झिशान सिद्दिकी वडिलांच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे झिशान सिद्दिकी अजित पवार गटाकडून वांद्रे पूर्व मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशारितीने अजित पवार मुंबईत या दोन जागांवर आपली दावेगारी या यात्रेनिमित्त निश्चित करु शकतात.   

(नक्की वाचा-  'अजितदादा म्हणाले, तुमच्यासाठी काय घर विकू", आशा वर्करने पगारवाढीबाबत सुप्रिया सुळेंसमोर मांडली व्यथा)

लोकसभेतील डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न

वांद्र पूर्व मतदारसंघ आणि अनुशक्ती नगर मतदारसंघ हे मुस्लीमबहुल मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. लोकसभा निडणुकीत महायुतीकडे मुस्लीम मतदारांनी पाठ फिरवल्याच समोर आलं होतं. याच मतदारांना साद घालण्याच प्रयत्न अजित पवार करु शकतात. नवाब मलिक, सना मलिक, बाबा सिद्दिकी आणि झिशान सिद्दिकी इत्यादींच्या मदतीने अजित पवार मुंबईत मुस्लीम मतदारांना साद घालू शकतात. अशारीतीने अजित जनसन्मान यात्रेनिमित्त एकाच अनेक गोष्टी साध्य करताना दिसत आहे. अजित पवारांची ही जुळवाजुळव किती यशस्वी होते हे येत्या काळात स्पष्ट होईल.  

Advertisement

UPSC द्वारे होणारी 'लॅटरल एन्ट्री' भरती काय आहे? राहुल गांधींसह विरोधकांचा विरोध का?

 

Advertisement