Ajit Pawar on ZP Election: "शब्द पाळणे ही माझी ओळख...", मतदानापूर्वी अजित पवारांची मतदारांना अखेरची साद

Ajit Pawar: अजित पवार यांनी मतदारांच्या नावे आपला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संदेश जारी केला आहे. "जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खरी किल्ली आहे," असे नमूद करत त्यांनी मतदारांना 'घड्याळ' चिन्हासमोरील बटन दाबून आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ajit Pawar News : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं  28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. अजित पवार बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्शभूमीवर प्रचारसभांसाठी निघाले होते. मात्र त्याआधीच काळाने घाला घातला. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उद्या 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याआधी अजित पवार यांना मतदारांसाठी दिलेला शेवटचा मेसेज राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. 

अजित पवार यांनी मतदारांच्या नावे आपला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संदेश जारी केला आहे. "जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खरी किल्ली आहे," असे नमूद करत त्यांनी मतदारांना 'घड्याळ' चिन्हासमोरील बटन दाबून आशीर्वाद देण्याचे आवाहन केले आहे.

अजितदादांचा मतदारांना शेवटचा संदेश

अजित पवार यांनी मतदारांना आवाहन करताना म्हटलं की, नमस्कार मतदार बंधू आणि भगिनिंनो, आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आणि जिल्हाचा सर्वांगिण विकास कोणाच्या हातात द्यायचा, हे ठरवण्याची ही महत्त्वाची वेळ आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाचा खरी किल्ली आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार यासारख्या मुलभूत प्रश्नांशी थेट जोडलेली ही संस्था आहे.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? धक्कादायक बाब आली समोर)

Advertisement

"शब्द पाळणे ही माझी ओळख"

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून काम केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून महिलांच्या संक्षमीकरणापर्यंत, तरुणांच्या रोजगारापासून ज्येष्ठांच्या सन्मानापर्यंत आणि विकासाचा प्रत्येक मुद्दा आम्ही गांभीर्याने हातळलेला आहे. मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे. दिलेला शब्द पाळणे ही माझी ओळख आहे, असं अजित पवारांनी अधोरेखित केले.

(नक्की वाचा-  Airtel ग्राहकांना झटका! प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ; कोणत्या ग्राहकांना बसणार फटका)

पाणीपुरवठा असो रस्त्यांची कामे असोत. आरोग्य सुविधा असोत किंवा शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अर्थात एआय डिजिटल साधनं असोत हे सर्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना साध द्या. स्वच्छ, कार्यक्षम आणि लोकभिमुख कारभाराच्यासाठी आम्हाला संधी द्या. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं आवाहन अजितदादांनी या संदेशाद्वारे केले आहे.

Advertisement

"निधी कमी पडू देणार नाही"

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही.  हा माझा शब्द आहे. विकासाच्या या प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हा. घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबा आणि मतरुपी आशीर्वाद आम्हाला द्या. तुमचं एक मत गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि गावाच्या समृद्धीसाठी आहे, हेही लक्षात ठेवा, असं अजित पवारांनी म्हटलं.
 

Topics mentioned in this article