NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाची घोषणा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर होणार होती,राजेश टोपेंचा मोठा दावा

Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची घोषणा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर होऊ शकली असतील, असा दावा माजी मंत्री राजेश टोपे यांनी केलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार होत्या?"
PTI And Rajesh Tope X

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दोन्ही पक्षांमधील नेतेमंडळींच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतेच राशपचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनीही पक्ष विलीनकरणासंदर्भातील मोठा दावा केलाय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची केवळ घोषणा होणे बोकी होते, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिलीय.

राजेश टोपे यांचा मोठा दावा

पक्ष विलीनीकरणाबाबत राजेश टोपे यांनी सांगितलं की, "दोन्ही पक्ष एकत्रित करण्याचा निर्णय जवळपास झाला होता. अजित पवार यांच्यासमोरच हा निर्णय झाला होता. या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. अंतिम बैठकाही झाल्या होत्या. आता आम्ही तुतारी चिन्हावर खूप कमी जागांवर निवडणुका लढवतोय. अधिकतर आम्ही घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढलोय. तर हे त्यांच्या सर्व लोकांच्या मान्यतेनुसार हे झालं होतं. फक्त घोषणा होणं बाकी होतं, जी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर होऊ शकली असती". 

राजेश टोपे काय म्हणाले, ऐका VIDEO

अजित पवारांची इच्छा लवकरच पूर्ण होणार होती : किरण गुजर 

दुसरीकडे अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनीही दावा केलाय की, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन्ही गटांचे विलीनीकरण करण्यास उत्सुक होते आणि त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार होती. 1980च्या दशकाच्या मध्यात राजकारणात येण्यापूर्वीपासून गुजर अजित पवार यांच्याशी जोडलेले आहेत. बुधवारी झालेल्या विमान अपघाताच्या ठीक पाच दिवस आधी पवारांनी त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती, असेही गुजर म्हणाले.

Advertisement

(नक्की वाचा: Ajit Pawar: अजित पवारांची खाती कोणाला मिळणार? सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार? सर्वांचे शरद पवारांकडे लक्ष)

शरद पवारही सकारात्मक होते?

पाच दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी विलीनीकरणाबाबत बातचित केली होती. प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि काही दिवसांतच दोन्ही गट विलीन होणार असल्याचे पवार यांनी सांगितलं होतं, असा दावा गुजर यांनी केलाय. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अन्य नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा सुरू होती आणि शरद पवार या निर्णयाला पाठिंबा देतील असे संकेत मिळत होते, अशीही माहिती किरण गुजर यांनी दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राशपने पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित लढल्या होत्या. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही दोघांनी एकत्रित निवडणुकी लढण्याचा निर्णय घेतला होता.  

(नक्की वाचा : Ajit Pawar News:अजितदादांचा पहाटेचा शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता तर... रावसाहेब दानवेंनी सांगितली Inside Story)