Ajit Pawar : 'आरोपींचे कापून टाकलं पाहिजे', बदलापूरच्या घटनेवर अजित पवार धारधार वक्तव्य

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. यवतमाळ जिल्हा हा कपाशीचं माहेरघर आहे. कापसाने विदर्भाला आर्थिक सुबकता दिली. शेतकरी कापूससह सोयाबीनही पिके मोठ्या प्रमाणात घेतात. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी समाधानी कसा होईल यासाठी आमचं सरकार काम करत आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं. 

जाहिरात
Read Time: 2 mins

बदलापुरात शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या घटनेवर संताप व्यक्त करताना जीभ घसरली आहे. आपल्या आई-बहिणींवर हात टाकणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं तर अशा आरोपींच गुप्तांगच कापलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजित पवार यांनी म्हटलं की, "जो चुकीचा वागेल त्याला शासन झालं पाहिजे. मग तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या किंवा कितीही मोठ्या वशिल्याचा असूद्या त्याची फिकीर आम्ही करणार नाही. आरोपीला कडक शासन करणार. आमचा प्रयत्न चालला आहे की, शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे पारित होण्यासाठी गेला आहे. तो लवकर मंजूर करुन घेण्याचा आमचा प्रयत्न आहे."

(नक्की वाचा -  उद्धव ठाकरेंच्या वाढत्या लोकप्रियतेची काँग्रेसला धास्ती, महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?)

"माझ्या मनात तर आहे ज्यावेळी अशी विकृत माणसे आमच्या आई-बहिणींवर मुलींवर हात टाकतात त्यावेळी त्यांना असा कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की त्यांना पुन्हा तसा विचार देखील आला नाही पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं तर त्यांचं 'सामान'च काढून टाकलं पाहिजे," असं अजित पवार यांनी म्हटलं.   

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. यवतमाळ जिल्हा हा कपाशीचं माहेरघर आहे. कापसाने विदर्भाला आर्थिक सुबकता दिली. शेतकरी कापूससह सोयाबीनही पिके मोठ्या प्रमाणात घेतात. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी समाधानी कसा होईल यासाठी आमचं सरकार काम करत आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं. 

Advertisement

(नक्की वाचा-  'कंस मामा राख्या बांधत फिरतायत, दुसरीकडे बहिणीवर अत्याचार ' ठाकरे गरजले)

अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत म्हटलं की, लाडकी बहीण ही चांगली योजना आहेत. मात्र विरोधक याचं राजकारण करतात. कुणालाही या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणार नाही. 

Topics mentioned in this article