संजय तिवारी, नागपूर
विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर अजित पवार यांचे नागपूरमध्ये अभिनंदनाचे बॅनर्स लागले आहेत. अजितदादा राजकारणातील चाणक्य अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत. नागपूरच्या विधानभवन परिसरात लागलेल्या या बॅनर्सची राज्यभर चर्चा आहे.
राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना शुभेच्छा देणारे हे बॅनर नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून लावण्यात आले आहे. राजकारणातील चाणक्य अजितदादा, असे बॅनर्स झळकले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानपरिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं की, "आज विकले गेलेले आणि विकत घेणारे दोघांनीही लक्षात ठेवावं. तुम्ही घोडेबाजारातील यशस्वी दलाल असाल, आम्हीही जमीन कसणारे बुलंद शेतकरी आहोत. भेटू विधानसभेच्या रणांगणात."
(नक्की वाचा- मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार?, सरकारला दिलेला अल्टिमेटमही आज संपणार)
विधानपरिषदेचा निकाल
विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे 5 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात होते. त्यांना महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांचं आव्हान होतं. महायुतीचे सर्व 9 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीनंतर महायुतीचे मतं फुटणार असं मानलं जात होतं, मात्र तसं झालं नाही.
( नक्की वाचा : Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं पावणेपाच वर्षांनी कमबॅक, विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय )
शेकापचे जयंत पाटील पराभूत
शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे विधान परिषदेतीमधील ज्येष्ठ आमदार होते. त्यांना पाच टर्म आमदारकीचा अनुभव होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्यांना पाठिंबा दिला होता. जयंत पाटील आणि शरद पवार या दोन अनुभवी नेत्यांच्या कौशल्याच्या जोरावर महाविकास आघाडीचे तीन्ही उमेदवार विजयी होतील, असं मानलं जात होतं. पण, प्रत्यक्षात महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले. तर अनुभवी जयंत पाटील यांचा पराभव झाला.